बांग्लादेशही आता पाकच्या मार्गावर, मोहम्मद यूनुस सरकार चीनकडून 20 खतरनाक फायटर जेट खरेदी करणार
बांग्लादेशात पुढच्या वर्षी फेब्रुवारीत सर्वसाधारण निवडणूका होत आहे, परंतू त्याच्या आधीत मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या एका निर्णयाची चर्चा सुरु आहे. बांग्लादेश चीनकडून 20 खतरनाक फायटर जेट खरेदी करण्याची तयारी करत आहे.

आपल्या उपकाराने जन्माला आलेला बांग्लादेश आता आपल्या भारतालाच नखं दाखवू लागला आहे. बांग्लादेशही आता पाकिस्तानच्या मार्गाने जात आहे. बांग्लादेशाच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनुस यांनी अलिकडेच चीनकडून 20 J-10CE मल्टीरोल फायटर जेट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या डीलचे बजेटच एकूण 15,500 कोटीचे आहे. म्हणजे बांग्लादेश या जेटवर 2.2 अब्ज डॉलर खर्च करणार आहे. या बातमीने सोशल मीडियावर खूपच चर्चा सुरु आहे.
स्थानिय सरकारच्या सल्लागार आसिफ महमूद यांनी या संदर्भात फेसबुक पोस्टकरुन माहिती दिली आहे.बांग्लादेश सरकार या फायटर जेट खरेदीला 2025-26 आणि 2026-27 आर्थिक वर्षात पूर्ण करण्याची योजना आखत आहे. पोस्टमध्ये हे सांगितले आहे की जेट खरेदी थेट चीनशी वा G2G ( सरकार-ते-सरकार ) कराराच्या माध्यमातून केले जाणार आहे. पुढच्या वर्षी फेब्रुवारीत बांग्लादेश सत्तातरानंतर पहिल्या सार्वजनिक निवडणूका घेणार आहे या पार्श्वभूमीवर ही घोषणा केलेली आहे. या टायमिंगवरही तज्ज्ञांनी सवाल केले आहेत.
सुरक्षा तज्ज्ञांच्या मते इतक्या मोठ्या आणि महागड्या संरक्षण खरेदीचा निर्णय नेहमी निवडून आलेल्या सरकारने घ्यायला हवा. हा खर्च जवळपास 15,500 कोटी टाका इतका आहे. आणि पुढच्या सरकारच्या डोक्यावर याचा बोजा पडणार आहे.
तर दुसरीकडे सरकारने या खरेदीचे उद्देश्य स्पष्ट केलेला आहे. बांग्लादेशाच्या एअरफोर्सला आधुनिक बनवणे आणि राष्ट्रीय हवाई सुरक्षेला मजबूत करणे हा या मागचा हेतू असल्याचे अंतरिम सरकारने स्पष्ट केले आहे. तज्ज्ञाचे मानने आहे की बांग्लादेश सध्याचे फायटर जेट जुनी मॉडेल्स आहेत. यासाठी नवीन जेट खरेदी करणे गरजेचे आहेत.
J-10CE फायटर जेट
J-10CE ही मल्टीरोल फायटर जेट चीनचे विकसित एअरक्राफ्ट आहेत. यांचा दोन्ही पद्धतीच्या मिशन संरक्षण आणि आक्रमण यासाठी वापर केला जाऊ शकतो.संरक्षण तज्ज्ञांच्या मते या जेटची सर्वात मोठी खासियत म्हणजे हे छोट्या जागेतूनही टेक-ऑफ करु शकतात. म्हणजे धावपट्ट्यांवर हल्ला झाला असेल तर हे जेट अन्य कोणत्याही भागातून थेट उड्डाण घेऊ शकतात. हे फायटर जेट सिंगल इंजिनचे असून याची सर्वात मोठी ताकद म्हणजे अत्यधिक मॅन्युव्हरिंग क्षमता आहे.
म्हणजे हे जेट हवेत वेगाने दिशा बदलू शकते आणि हवेत शत्रूच्या जेट वा मिसाईल हल्ल्यापासून स्वत:ला वाचवू शकते. हे ध्वनीच्या दुप्पट वेगाने उडते. म्हणजे ते 2,415 किलोमीटर प्रति तास वेगाने उडू शकते. याची डिझाईन यास एअरक्राफ्ट कॅरियर्स आणि जमीन दोन्हीवरुन ऑपरेट करण्यास सक्षम बनवते.
आधीही झाली याची चर्चा
वास्तविक बांग्लादेश फायटर जेट खरेदी करण्याची चर्चा साल 2016 पासून चालू होत्या. आधी फ्रान्सचे राफेल, युरोफायटर टायकून आणि अमेरिकेचे F-16 जेटचा देखील विचार झाला होता. कोरोना संकटामुळे हा निर्णय पुढे ढकलला गेला. आता अंतरिम सरकारच्या काळात पुन्हा एकदा ही फाईल बाहेर आली आहे.
