AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून आनंदाची बातमी! भारत एका झटक्यात भरून काढणार टॅरिफचे नुकसान, 135 अरब डॉलरचा व्यापार, झिरो कर..

अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफमुळे काही क्षेत्रात चिंतेचे वातावरण बघायला मिळाले. अमेरिकेत होणारी 70 टक्के निर्यात बंद झाली. आता भारत सरकारने अत्यंत मोठा निर्णय घेतलाय. हेच नाही तर तब्बल 135 अरब डॉलरचा व्यापार भारत टॅरिफशिवाय करणार आहे. यामुळे टॅरिफचे नुकसान भरून निघणार आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून आनंदाची बातमी! भारत एका झटक्यात भरून काढणार टॅरिफचे नुकसान, 135 अरब डॉलरचा व्यापार, झिरो कर..
Donald Trump
| Updated on: Sep 08, 2025 | 8:39 AM
Share

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला. या टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेतील अनेक वर्षांचे चांगले संबंध बिघडले आहेत. अमेरिकेतून भारताला सातत्याने टॅरिफच्या मुद्द्यावरून धमकावले जात आहे. भारत हा रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्याने भारतावर टॅरिफ लावल्याचे स्पष्ट सांगताना डोनाल्ड ट्रम्प दिसले. हेच नाही तर भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करावे, आम्ही त्यांच्यावरील 25 टक्के टॅरिफ लगेचच काढू असे डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले. अमेरिकेने भारतावर लावलेल्या 50 टक्के टॅरिफमुळे अमेरिकेत होणाऱ्या निर्यातीवर त्याचा थेट परिणाम झालाय.

भारताने देखील हे नुकसान भरून काढण्यासाठी पाऊले उचलली आहेत. आता भारत असा निर्णय घेणार आहे की, ज्यामुळे होणारे नुकसान आरामात भरून निघणार आहे. भारताला कोणत्याही टॅरिफशिवाय 135 अब्ज डॉलर्सचा व्यापार करण्याची मोठी संधी मिळणार आहे. यावर चर्चा सुरू असून लवकरच निर्णय होऊ शकतो. हा अमेरिकेच्या टॅरिफनंतर भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा दिलासाच म्हणावा लागेल.

रिपोर्टनुसार, भारत आणि युरोपियन युनियन पुढील महिन्यात त्यांच्या महत्त्वाकांक्षी मुक्त व्यापार कराराला (FTA) लवकरच अंतिम स्वरूप देण्यासाठी दोन महत्त्वाच्या दोन बैठका घेतील. यादरम्यान नियम, बाजारपेठ प्रवेश, वाइन आणि दुग्धजन्य पदार्थांवरील शुल्क या क्षेत्रातील मतभेद दूर होतील. जर यावर एकमत झाले तर या वर्षी करार पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि यामधून मोठा फायदा आणि टॅरिफचे होणारे नुकसान भरून निघेल.

युरोपियन कमिशनच्या आयुक्त क्रिस्टोफ हॅन्सन आणि व्यापार प्रमुख मारोस सेफकोविक हे भारताच्या दाैऱ्यावर असणार आहेत. या वर्षाच्या अखेरीस एफटीएवर सह्या दोन्ही बाजूंनी केल्या जातील. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफमुळे काही क्षेत्रामध्ये मोठे नुकसान झाले असून व्यापारी चिंतेत आहेत. मात्र, आता यातून मार्ग काढण्यासाठी भारताने मोठा प्लन केला असून भारताने हे दाखवून दिले की, काहीही झाले तरीही आम्ही तुमच्यासमोर हात पसरवणार नाहीत. यासोबतच अमेरिकेचा दबाव असताना देखील भारताने काही महत्वाचे करार हे रशियासोबत केली आहेत.

Follow Us
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत CM देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
सयाजी शिंदे संतापले! 'झाडामध्ये देव आहे, त्याला विकणार का?' म्हणत...
सयाजी शिंदे संतापले! 'झाडामध्ये देव आहे, त्याला विकणार का?' म्हणत वृक्षतोडीला विरोध
गोकुळ दुध संघाबाबत मोठी अपडेट समोर! सरकारच्या 'त्या' निर्णयाला...
गोकुळ दुध संघाबाबत मोठी अपडेट समोर! सरकारच्या 'त्या' निर्णयाला राज्यपाल जिष्णू देव वर्मांची मंजुरी
सर, माझा जीव वाचवा' म्हणणाऱ्या वैभव चव्हाणच्या कुटुंबीयांची मनोज...
सर, माझा जीव वाचवा' म्हणणाऱ्या वैभव चव्हाणच्या कुटुंबीयांची मनोज जरांगेंनी घेतली भेट; प्रकरणाला नवे वळण!
संजय राऊतांनी आधी उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करावा; नवनाथ बन यांचा..
संजय राऊतांनी आधी उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करावा; नवनाथ बन यांचा खोचक टोला!
आनंदाचा शिधा घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी; खासदार संजय देशमुख....
Washim : आनंदाचा शिधा घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी; खासदार संजय देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर मोठी झुंबड
दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; BKC मध्ये AQI 170 वर....
Mumbai Air Pollution : दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; BKC मध्ये AQI 170 वर, निर्बंध झुगारून आतषबाजी सुरूच
युतीतच डावललं जात असेल तर फायदा काय? शिंदे गटाच्या नेत्यांची एकनाथ....
Shinde Group Vs BJP : युतीतच डावललं जात असेल तर फायदा काय? शिंदे गटाच्या नेत्यांची एकनाथ शिंदेंकडे भाजपविरोधात तक्रार, नेमकं काय घडतंय?
E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 30 टक्क्यांपार? कर्नाटकच्या अहवालाने
Rahul Gandhi : E20 Petrol : E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 30 टक्क्यांपार? कर्नाटकच्या अहवालाने खळबळ; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत तटकरे यांचं ते वक्तव्य; रुपाली ठोंबरे..
NCP : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सुनील तटकरे यांचं ते वक्तव्य; रुपाली ठोंबरे पाटील काय म्हणाल्या?