India in UNSC: पाकिस्तानात बॉम्ब स्फोटातील आरोपींना पंचतारांकित सुविधा

मुंबईमध्ये 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटातील आरोपी पाकिस्तानमध्ये पंचतारांकित सुविधांचा लाभ घेत असल्याचे मत संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत टी. एस. तिरुमुर्ती यांनी व्यक्त केले.त्यांनी अप्रत्यक्षपणे आंतरराष्ट्रीय आरोपी दाऊद इब्राहिम यांच्याकडेच बोट केले आहे.

India in UNSC: पाकिस्तानात बॉम्ब स्फोटातील आरोपींना पंचतारांकित सुविधा
टी. एस. तिरुमूर्ती t.s.trimurti
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 3:45 PM

दिल्लीः मुंबईमध्ये 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटातील (Mumbai Bomb Blasts) आरोपी पाकिस्तानमध्ये पंचतारांकित सुविधांचा लाभ घेत असल्याचे मत संयुक्त राष्ट्रातील (United Nations) भारताचे राजदूत टी. एस. तिरुमुर्ती (TS Tirumurti) यांनी व्यक्त केले.त्यांनी अप्रत्यक्षपणे आंतरराष्ट्रीय आरोपी दाऊद इब्राहिम यांच्याकडेच बोट केले आहे. मंगळवारी झालेल्या ग्लोबल काऊंटर टेररिझ्म काऊन्सिलद्वारे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी प्रतिबंधक संमेलन 2022 मध्ये त्यांनी मत व्यक्त केले.

दहशतवाद आणि देशांतर्गत असलेल्या संघटित गुन्हेगारीविषयी माहिती असणे गरजेचे आहे. त्यांनी सांगितले की, आम्ही बघितले आहे की, १९९३ च्या साखळी बॉम्ब स्फोटातील जबाबदार असलेले आरोपींनी फक्त संघटनांनीच नाही तर सरकारकडूनही सुरक्षा पोहचविण्यात आली आहे. त्याही पुढे जाऊन बॉम्बस्फोटातील आरोपी पंचतारांकित सुविधांचा आनंद घेत आहेत. तिरुमूर्ती यांच्या या वक्तव्याचा संबंध डी-कंपनी आणि आरोपी दाऊद इब्राहिम यांच्याशी जोडला जात आहे.कारण या बॉम्बस्फोटातील आरोपी सध्या पाकिस्तानात लपून बसले आहेत.

दाऊद पाकिस्तानात असल्याची कबूली

पाकिस्तानकडून ऑगस्ट 2020 मध्ये पहिल्यांदा दाऊद पाकिस्तानात असल्याची कबूली दिली होती. पाकिस्तानातील त्यावेळच्या सरकारनेही बंदी घातलेल्या 88 दहशतवादी संघटना आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांवर बंदी घातली होती. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हेगार दाऊद इब्राहिमचाही समावेश होता. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे (यूएनएससी)च्या दहशतवाद प्रतिबंधक कारवाई समितीचे अध्यक्ष तिरुमूर्ती यांनी स्पष्ट केले की, 1267 अल-कायदा प्रतिबंध समिती’ समवेत संयुक्त राष्ट्राची प्रतिबंध प्रणाली, दहशतवादाला वित्तपुरवठा रोखण्यासाठी, त्यांचा प्रवास थांबविण्यासाठी आणि दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे पोहचविणाऱ्या संघटनाना लगाम लावण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्वपूर्ण प्रयत्न केले जात आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवरी दहशतवादाविषयी चिंता व्यक्त करताना ते म्हणाले की, या उपाययोजनांची अंमलबजावणी करणे आव्हानात्मक आहे. “आंतरराष्ट्रीय परिषदेने स्थापन केलेल्या सर्व निर्बंध शासन आणि त्यांच्या कामकाजात आणि निर्णय प्रक्रियेत योग्य प्रक्रियेचे पालन करणे महत्वाचे आहे.” निर्णय घेण्याची प्रक्रिया आणि दहशतवादी संघटनांची यादी बनविताना किंवा त्या यादीतून काढून टाकण्याची पावले तत्पर, प्रामाणिक, पुराव्यावर आधारित असणे गरजेची आहेत. आणि याबाबत राजकीय आणि धार्मिक विचारमंथन करणे चुकीचे असणार आहे.

संबंधित बातम्या

भूमी अधीग्रहण कायद्याला विरोध करणारे पवार आता कुठे आहेत? राजू शेट्टींचा सवाल, तर आजच्या निकालाबाबत म्हणतात…

Nagar Panchayat Election result 2022 : ज्या मतदारसंघात पटोलेंनी मोदींना मारण्याची भाषा केली, तिथं काँग्रेस हरली की जिंकली?

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाची निवृत्तीची घोषणा

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....