AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशींना विदेशी मद्याची भुरळ, भारतीयांना आता फ्रान्स ऐवजी ब्रिटीश स्कॉच व्हीस्कीचा लागला चस्का

भारतीयांना आता देशी ऐवजी विदेशी मद्याचा चस्का लागला आहे, पूर्वी फ्रान्सची व्हिस्की पसंद केली जायची आता ब्रिटनच्या स्कॉच व्हीस्कीची आयात वाढली आहे.

देशींना विदेशी मद्याची भुरळ, भारतीयांना आता फ्रान्स ऐवजी ब्रिटीश स्कॉच व्हीस्कीचा लागला चस्का
Scotch-WhiskeyImage Credit source: socialmedia
| Updated on: Feb 13, 2023 | 9:50 AM
Share

नवी दिल्ली : ब्रिटीशांना आपल्यावर राज्य केले होते. परंतू आता ब्रिटीश स्कॉच व्हीस्की ( whisky ) आपल्यावर राज्य करीत आहे अशी आकडेवारी समोर आली आहे. आयातीचा ( import )  आकडा हेच सांगत आहे. आयात – निर्यातीची आकडेवारी पाहता भारताने फ्रान्सला मागे टाकत ब्रिटनच्या ( britain )  स्कॉच व्हीस्कीची आयात वाढविली आहे. भारत आता ब्रिटनसाठी स्कॉच व्हीस्कीची सर्वात मोठी बाजारपेठ ठरला आहे. आतापर्यंत भारतात फ्रेंच व्हीस्की जास्त पसंत केली जात होती. परंतू आता फ्रेंच व्हीस्कीची जागा आता ब्रिटीश स्कॉच व्हीस्कीने घेतली आहे.

देशींना आता विदेशी मद्याचा चस्का लागला आहे. देशी इंडीयन आता विदेशी मद्याला अधिक पसंती देऊ लागले आहेत. स्कॉटलंडच्या प्रमुख उद्योग संस्थेच्या 2022 आकडेवारीनूसार ब्रिटनवरून भारतात येणाऱ्या विदेशी स्कॉच व्हीस्कीची आयात आश्चर्यकारक वाढली आहे. ही वाढ साठ टक्के इतकी आहे. स्कॉच व्हिस्की असोसिएशनने( एसडब्ल्यूए ) शुक्रवारी म्हटले आहे की भारताने गेल्या वर्षी स्कॉच व्हिस्कीच्या 700 मिलीलीटरच्या 21.9 कोटी बाटल्याची आयात केली आहे. तर फ्रान्सच्या 20.5 कोटी बाटल्यांची आयात केली आहे. यावरून स्पष्ट होत आहे की भारतीय स्कॉच बाजाराने गेल्या दशकात 200 टक्के जास्त वृद्धी दर्शविली आहे. यामुळे स्कॉच व्हिस्की आयातीत भारताने फ्रान्सला मागे टाकले आहे. असोसिएशनने म्हटले आहे की दोन आकडी वाढ झाली असली तरी स्कॉच व्हीस्कीची संपूर्ण भारतातील व्हीस्कीच्या बाजारातील हिस्सेदारी केवळ दोन टक्के आहे.

युरोपीय देशांतून स्कॉचच्या निर्यातीत खूपच वाढ नोंदवण्यात आली आहे. संपूर्ण जगात 6.2 अब्ज पौंड व्हीस्कीची निर्यात झाली असून हा एक विक्रम आहे. पहिल्यांदाच हा आकडी सहा अब्जापर्यंत पोहचला आहे. यात गेल्यावेळे पेक्षा 37 टक्के वाढ झाली आहे.व्हीस्की ही ब्रिटनच्या सर्वात मोठी आयातपैकी आहे. ब्रिटनमधून सर्वात जास्त अमेरीकेला स्कॉच निर्यात केली गेली आहे. स्कॉटलंडवरून अमेरीकेला 105.3 कोटी डॉलरची व्हीस्की निर्यात केली गेली आहे. तर भारताला 28.2 कोटी पौंड व्हिस्की निर्यात झाली आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.