AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टॅरिफचे अब्जावधी डॉलर्स भारतात परत येणार, गुड न्यूज, थेट अमेरिकेतून कंपन्यांच्या..

Trump Tariffs : इराण आणि अमेरिका युद्ध सुरू असताना भारतासाठी आनंदाची बातमी आली. भारत आता मालामाल होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. भारताला मोठा पैसा मिळणार आहे. विशेष म्हणजे हा पैसा अमेरिकेतून येणार आहे.

टॅरिफचे अब्जावधी डॉलर्स भारतात परत येणार, गुड न्यूज, थेट अमेरिकेतून कंपन्यांच्या..
Donald Trump tariffs
| Updated on: Apr 21, 2026 | 3:08 PM
Share

इराण आणि अमेरिका यांच्या युद्धात जग तणावात आहे. परिस्थिती अधिक बिकट होत आहे. तेलाचे मोठे संकट निर्माण झाले. भारतालाही या युद्धाचा फटका बसत आहे. यादरम्यानच अमेरिकेडून अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफच्या माध्यमातून जमा केलेले अब्जावधी डॉलर्स परत करण्याचा निर्णय घेतला. फक्त निर्णयच नाही तर याबाबतची संपूर्ण प्रक्रिया देखील सुरू झाली. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने टॅरिफला बेकायदेशीर ठरवले आहे. टॅरिफच्या माध्यमातून 166 अब्ज डॉलर्सची कमाई करण्यात आली होती. आता तेच 166 अब्ज डॉलर्स परत करण्याची वेळ डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आली. भारतावर तब्बल 200 टक्के टॅरिफ काही दिवस डोनाल्ड ट्रम्प यांनी लावला होता. त्यावेळी भारताचे खूप जास्त नुकसान झाले. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केली, त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेत भारतावरील टॅरिफ कमी केला होता.

अमेरिकेकडून परत केला जाणारा टॅरिफ भारतासाठी अत्यंत महत्वाचा आहे. अमेरिकेकडून जी टॅरिफची रक्कम परत केली जाणार आहे, त्याच भारताचा मोठा हिस्सा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंदाजे 12 अब्ज डॉलर्समध्ये भारताच्या मालाचा यामध्ये समावेश आहे. आता यामुळेच भारत हा या परताव्याचा प्रमुख भागेदार ठरला आहे. भारतात मोठी रक्कम परत येणार आहे.

अमेरिकेकडून परतावा मिळणार असला तरीही भारताला थेट पैसे मिळू शकणार नाहीत. अमेरिकेच्या व्यापार नियमाप्रमाणे, परतावा फक्त आयातदारांना म्हणजेच अमेरिकेत माल आयात करताना शुल्क भरलेल्या अमेरिकन कंपन्यांनाच दिला जातो. त्यामुळे तांत्रिक गोष्टींमुळे हे पैसे भारतीय निर्यातदारांना कंवा सरकारला नाही तर अमेरिकन आयातदारांना मिळतीय. त्यानंतर ते पैसे भारतीय निर्यातदारांना मिळतील.

भारतीय निर्यातदार त्यांच्या अमेरिकन खरेदीदाराकडून चर्चा करून आपली रक्कम परत मिळू शकतात. टॅरिफ  हटवल्यामुळे भारतीय वस्तू अमेरिकेच्या बाजारपेठेत स्वस्त आणि अधिक पोहोचतील. ऑनलाईन प्रक्रिया करून हे शुल्क परत मिळवले जाऊ शकते. 90 दिवसांच्या आत पैसे परत मिळण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. भारतासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. यामुळे भारतीय व्यापाऱ्यांचे झालेले नुकसान आता भरून निघू शकते.

Follow Us
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली उपस्थिती; नेमकी भानगड काय?
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्र
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्री'वरील बैठकीआधीच नॉट रिचेबल
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
Video | 40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेलं गाव अवशेषांसह आलं वर; पहा व्हिडीओ
'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
Sanjay Raut On Dharavi | 'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता मुंब्य्रात...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट महाजनांच्या भेटीला; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं?
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?