AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोबतच्या 2 प्रतिनिधींना कोरोना, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर लंडनमध्ये विलगीकरणात, G-7 राष्ट्रांच्या बैठकीत व्हर्च्यूअली सहभाग

लंडन येथे होत असलेल्या G-7 राष्ट्रांच्या बैठकीला हजेरी लावण्यासाठी गेलेले परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर विलगीकरणात गेले आहेत. (s jaishankar g 7 sumeet corona positive)

सोबतच्या 2 प्रतिनिधींना कोरोना, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर लंडनमध्ये विलगीकरणात, G-7 राष्ट्रांच्या बैठकीत व्हर्च्यूअली सहभाग
S JAISHANKAR
| Updated on: May 05, 2021 | 11:36 PM
Share

लंडन : लंडन येथील G-7 राष्ट्रांच्या बैठकीला हजेरी लावण्यासाठी गेलेले परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर ( S Jaishankar) विलगीकरणात गेले आहेत. लंडनमध्ये त्यांच्यासह त्यांच्या संपूर्ण प्रतिनिधी मंडळानेसुद्धा विलगीकरणात जाण्याचा निर्णय घेतला. जयशंकर यांच्यासोबत असलेल्या प्रतिनिधींपैकी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर तसा निर्णय घेण्यात आला. एस. जयशंकर इतर देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी व्हर्च्यूअली संवाद साधतील. तशी माहिती त्यांनी ट्विट करत दिली आहे. (Indian foreign minister S Jaishankar decided to self isolate himself in G 7 sumeet after two delegates with him tested Corona positive)

जयशंकर यांच्या प्रतिनिधी मंडळातील दोघांना कोरोना

सध्या भारत देशात कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे. या लाटेमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. याच पार्श्वभूमीवर लंडन येथे तेथील परराष्ट्रमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जी- 7 राष्ट्रांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या जी-7 राष्ट्रांचा भारत सदस्य नसला तरी ब्रिटनकडून भारताला या राष्ट्रांच्या बैठकीत पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. या बैठकीत ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया या देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. लंडनच्या आमंत्रणामुळे जयशंकर यांनी या जी-7 राष्ट्रांच्या बैठकीली हजेरी लावली. मात्र, यावेळी खबरदारी म्हणून जयशंकर यांच्यासोबत असलेल्या प्रतिनिधी मंडळाची कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी प्रतिनिधींपैकी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

एकूण 10 दिवस विलगीकरणार राहण्याचा नियम

प्रतिनिधी मंडळातील दोघांना कोरोनाची लागण झाल्यानंतर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी जी-7 राष्ट्रांच्या बैठकीत व्हर्च्यूअली सहभागी होण्याचा निर्णय घेतला. लंडन येथील करोना प्रतिबंधक नियमानुसार कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आल्यानंतर एकूण 10 दिवस विलगीकरणात राहावे लागते. त्यामुळे आता एस. जयशंकर यांनासुद्धा 10 दिवस विलगीकरणात राहावे लागण्याची शक्यता आहे. जयशंकर यांच्यासोबत भारताचे सर्व प्रतिनिधी मंडळसुद्धा विलगीकरणात गेले आहे.

दरम्यान, लंडन येथील लंकेस्टर हाऊस येथे झालेल्या जी-7 राष्ट्रांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत भारताचे प्रतिनिधी प्रत्यक्षपणे उपस्थित नव्हते. मात्र, ही बैठक नंतर ठरलेल्या कार्यक्रमपत्रिकेनुसार पर पडली. भारतीय प्रतिनिधींना या बैठकीत प्रत्यक्ष सहभाग नोंदवता न आल्यामुळे ब्रिटनच्या एका प्रतिनिधीने दु:ख व्यक्त केले. तसेच कोरोनाची कडक पद्धतीने चाचणी केल्यामुळे असे घडले, असे स्पष्टीकरणसुद्धा त्यांनी दिले.

इतर बातम्या :

चीनचं रॉकेटवरील नियंत्रण सुटलं, ‘या’ देशांवर कधीही कोसळण्याची शक्यता, पृथ्वी संकटात ?

Warren Buffett | वॉरेन बफेट यांचा उत्तराधिकारी भारतीय असणार? त्यांना मिळाला त्यांच्यासारखा जादूगार

Bill Melinda Gates divorce : बिल गेट्स आणि पत्नी मेलिंडाचा घटस्फोट, कारण काय?

(Indian foreign minister S Jaishankar decided to self isolate himself in G 7 sumeet after two delegates with him tested Corona positive)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.