Warren Buffett | वॉरेन बफेट यांचा उत्तराधिकारी भारतीय असणार? त्यांना मिळाला त्यांच्यासारखा जादूगार

Warren Buffett | वॉरेन बफेट यांचा उत्तराधिकारी भारतीय असणार? त्यांना मिळाला त्यांच्यासारखा जादूगार
Warren Buffett

जगातील सर्वात यशस्वी अब्जाधीश गुंतवणूकदार, शेअर मार्केटचे जादूगार आणि बर्कशायर हॅथवेचे (Warren Buffett Successor) प्रमुख वॉरेन बफेट यांना त्यांचा उत्तराधिकारी मिळाला आहे.

Nupur Chilkulwar

|

May 04, 2021 | 9:45 AM

मुंबई : जगातील सर्वात यशस्वी अब्जाधीश गुंतवणूकदार, शेअर मार्केटचे जादूगार आणि बर्कशायर हॅथवेचे (Warren Buffett Successor) प्रमुख वॉरेन बफेट यांना त्यांचा उत्तराधिकारी मिळाला आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, बफेट म्हणाले की त्यांच्यानंतर Greg Abel कंपनीची जबाबदारी स्वीकारेल. सीएनबीसीला ते म्हणाले, जर आज रात्री मला काही झालं तर उद्या सकाळी ग्रेग एबेल कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची जबाबदारी स्वीकारतील. ग्रेग सध्या बर्कशायर हॅथवेच्या नॉन-इश्योरेंस बिजनेसचे वाईस चेअरमन आहेत (Warren Buffett Reveals Greg Abels Name As His Successor For Berkshire Hathaway).

वॉरेन बफे सध्या 90 वर्षांचे आहेत, तरी आजपर्यंत त्यांनी कधीही आपल्या पदाचा राजीनाम्याबाबत कधीही उघडपणे वाच्यता केली नाही. 2018 पासून ग्रेग एबेल कंपनीचे वाईस चेअरमन आहेत. बर्कशायरकडून अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिय मिळालेला नाही. बर्कशायरचे नवे प्रमुख कोण असतील याबद्दल सुमारे 15 वर्षांपासून चर्चा आहे. 2006 मध्ये जेव्हा वारेन बफेट 75 वर्षांचे होते तेव्हा त्यांनी सर्वप्रथम शेअर्स धारकांना लिहिलेल्या पत्रात आपल्या उत्तराधिकाराबाबत उल्लेख केला होता. बफेट हे 1965 पासून बर्कशायर हॅथवे चालवत आहेत.

अजित जैन सीईओच्या शर्यतीत नंबर दोनवर

याशिवाय, बफेट यांनी सीएनबीसीला हे देखील सांगितले की Greg Abel यांना काही झाले तर अजित जैन हे CEO म्हणून कार्यभार स्वीकारतील. ते एक भारतीय अमेरिकन आहेत. बर्कशायर हॅथवेच्या विमा व्यवसायाची देखरेख अजित जैन करतात. अजित जैन हे ग्रेगपेक्षा 10 वर्षांनी मोठे आहेत. असा विश्वास आहे की त्यांचा मुलगा हॉवर्ड यांना कार्यकारी अध्यक्ष करता येईल. त्यांचे इन्व्हेस्टमेंट मॅनेजर Todd Combs आणि Ted Weschler मुख्य गुंतवणूक कार्यालयाच्या लाइनमध्ये असतील.

1992 मध्ये कंपनीशी जुळले

Abel सध्या बर्कशायर हॅथवेचे बरेच व्यवसाय सांभाळतात. यात बर्कशायर एनर्जी, BNSF railroad, डेअरी क्वीन आईस्क्रीम, See’s Candies, Fruit of the Loom underwear यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. त्यात 3 लाख 9 हजार कर्मचारी काम करतात.

Abel यांच्या जन्म कॅनडाच्या Alberta येथे झाला होता. युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा येथून त्यांनी 1984 पदवीचे शिक्षण पूर्ण केलं. ते प्रथम पीडब्ल्यूसीमध्ये होते. त्यानंतर ते जियोथर्मल एनर्जी कंपनी CalEnergy मध्ये होते. तिथून सोडल्यानंतर त्यांनी 1992 मध्ये Berkshire Hathaway Energy येथे कामाला लागले.

Warren Buffett Reveals Greg Abels Name As His Successor For Berkshire Hathaway

संबंधित बातम्या :

Bill Gates On Corona Vaccine | बिल गेट्सचं भारतविरोधी वक्तव्य ?, म्हणतात विकसनशील देशांना लसीचा फॉर्म्यूला देऊ नये

Bill Melinda Gates divorce : बिल गेट्स आणि पत्नी मेलिंडाचा घटस्फोट, कारण काय?

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें