AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांना दणका, पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार ‘या’ देशाचे परराष्ट्र मंत्री, टॅरिफचा वाद…

डोनाल्ड ट्रम्प यांची भारताबद्दलची भाषा बदलली नाही. त्यांच्याकडून भारताला टॅरिफच्या मुद्द्यावर धमकावले जात आहे. मात्र, भारत हा अजून झुकला नाही. भारताने आता डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका दिला असून दिल्लीमधील घडामोडींना वेग आल्याचे बघायला मिळत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना दणका, पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार 'या' देशाचे परराष्ट्र मंत्री, टॅरिफचा वाद...
Minister Narendra Modi and Donald Trump
| Updated on: Aug 18, 2025 | 9:15 AM
Share

भारत आणि अमेरिकेत टॅरिफच्या मुद्द्यावर वातावरण तापलेले असतानाच मोठ्या घडामोडींना वेग आल्याचे बघायला मिळतंय.  चीनचे परराष्ट्र मंत्री तीन दिवसीय भारत दाैऱ्यावर आहेत. यादरम्यान अनेक महत्वाच्या बैठकी दिल्लीमध्ये पार पडणार आहेत. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी हे 18 ते 20 ऑगस्ट 2025 दरम्यान भारतात असणार आहेत. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत त्यांची सर्वात अगोदर महत्वाची बैठक पार पडले. त्यानंतर ते अजित डोभाल यांच्यासोबत देखील भेट घेणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वांग यी यांच्यातही बैठक होणार आहे. अमेरिकेने भारतावर टॅरिफ लादल्यानंतर अमेरिकेच्या विरोधात भूमिका घेताना चीन दिसला.

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात 19 ऑगस्टला 7 लोक कल्याण मार्गवर भेट होणार आहे. या भेटीला अत्यंत महत्व आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफच्या मुद्द्यावरून चीनसोबत वेगळी भूमिका घेतली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे चीन पुढे झुकले असून त्यांच्यावर अतिरिक्त टॅरिफ लादला नसून 90 दिवसांचा वेळ दिला असून त्यामधून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न देखील केली जात आहेत. मात्र, भारतावर सध्या 25 टक्के टॅरिफ लावला आहे.

27 ऑगस्टला अजून 25 टक्के टॅरिफ लावून अमेरिकेकडून भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला जाणार आहे. भारताने अमेरिकेच्या कोणत्याही अटी मान्य केल्या नाहीत. त्यापूर्वी मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि चीन यांच्यातील संबंध सुधारल्याचे बघायला मिळतंय. वांग यी आणि एस. जयशंकर यांच्या भेटीमध्ये सीमा प्रश्नावर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. मागील काही दिवसांमध्ये भारत आणि चीनच्या सीमेवर तणाव बघायला मिळाला.

भारत टॅरिफच्या मुद्द्यावरून कशाप्रकारे मार्ग काढतो, याकडे संपूर्ण जगाच्या नजरा आहेत. अमेरिकेने फक्त ब्राझील आणि भारतावर 50 टक्के टॅरिफ लादला आहे. इतर देशांना त्यांनी टॅरिफमधून मोठी सूट दिली आहे. भारताच्या शेजारी देशांना इतक्या मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावण्यात आला नाहीये. मुळात म्हणजे भारताने जर अमेरिकेच्या टॅरिफच्या अटी मान्य केल्या तर त्याचा थेट परिणाम हा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार आहे. वांग यी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला अत्यंत महत्व आहे आणि हा डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका म्हणावा लागेल.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.