AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Google Job: भारतीय महिलेने गुगलची 2.7 कोटी पगाराची नोकरी सोडली, या देशात झाली शिफ्ट

एका भारतीय महिलेने तिची चांगली गडगंज पगाराची गुगलची नोकरी अचानक सोडून अमेरिकेतून दुबईला शिफ्ट होण्याचा प्लान केला. या महिलेने हा निर्णय का घेतला याचा खुलासा केला आहे.

Google Job: भारतीय महिलेने गुगलची 2.7 कोटी पगाराची नोकरी सोडली, या देशात झाली शिफ्ट
google job
| Updated on: Apr 16, 2026 | 7:42 PM
Share

नोकरी सरकारी असो की खाजगी ती मिळवणे आणि टीकून ठेवणे हल्ली अवघड झालेले आहे. या महागाईच्या काळात कंपन्या कॉस्ट कटिंगच्या नावावर कर्मचाऱ्यांना काढून टाकत आहेत. अशा अनिश्चिततेच्या वातावरणात नोकरी करणे अवघड काम झाले आहे. अशात एका महिलेने गुगलची आपली कोट्यवधी रुपयांच्या पगाराची नोकरी सोडून दुबई शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आणि कुटुंबियांसह शिफ्ट देखील झाली. या संदर्भात तनु पुरी यांनी स्वत:च सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन ही घोषणा केली आहे.

कोट्यवधी पगाराची नोकरी का सोडली ?

सोशल नेटवर्कींग साईट इंस्टाग्रामवर अलिकडे एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होतो आहे.या व्हिडीओत तनु पुरी नावाच्या एका महिलने सांगितले की तिने शिकागो येथून गुगलची नोकरी सोडून दुबई जाण्याचा निर्णय घेतला आणि शिफ्ट झाली. तिने या व्हिडीओला शेअर करीत सांगितले की ती गुगलमध्ये काम करत होती आणि जीवन अगदी परफेक्ट होते. तिच्याजवळ भविष्यासाठी आर्थिक सुरक्षितता होती. परंतू तरीही सुट्टीवर जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागत होती. नंतर वेळ आली ले-ऑफची आणि १० वर्षांची सिक्युरीटी एका ई-मेलने गेली.

आपल्या मर्जीने जगायचे होते –

तनु पुरी हीने सांगितले की तिला आणि तिच्या पतीला त्यांचे जीवन स्वत:च्या पद्धतीने जगायचे होतो. दुबईतील नोकरी आणि शिकागोची लाईफ देखील परफेक्ट होती. परंतू आपले जीवन तिला स्वत:च्या पद्धतीने जगायचे होते. त्यामुळे तिने दुबईत शिफ्ट होण्याचा विचार केला. हा कोणताही बॅकअप प्लान नव्हता, स्वत:ची चॉईस होती. निर्णय थोडा अवघड होता, परंतू यास विचारपूर्वक केलेल्या प्लानने सोपे बनवले.

येथे पाहा पोस्ट –

View this post on Instagram

A post shared by Tanu Puri (@tanupuri07)

सोशल मीडियावरुन काय आल्या रिएक्शन

तनु पुरी हीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा मुद्दा ठरला आहे, लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक तनु आणि तिच्या फॅमिलीच्या निर्णयाचे कौतूक करत आहेत. तर काही लोक यास मुर्खपणाचा निर्णय म्हणत आहेत. मात्र, तनु पुरी हीने दोन्ही कमेंटचे स्वागत केले आहे. तिने आणखी एक व्हिडीओ शेअर करुन सांगितले की हा निर्णय तिने स्वत: घेतला आहे.तिने तिच्या आत्मविश्वासाला सोडले नाही घेतलेल्या निर्णयासोबत कायम राहिली.

Follow Us
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल.
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला.
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?.
महिलांच्या अधिकारांना विरोध करणाऱ्यांना महिलांनीच उत्तर दिलं – मोदी
महिलांच्या अधिकारांना विरोध करणाऱ्यांना महिलांनीच उत्तर दिलं – मोदी.
पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये?
पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये?.
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान.
आयटी कंपनीतील धर्मांतराचा उद्रेक... सकल हिंदू समाजाचा महाएल्गार
आयटी कंपनीतील धर्मांतराचा उद्रेक... सकल हिंदू समाजाचा महाएल्गार.
नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल.
काहीच आठवेना... माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिं
काहीच आठवेना... माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिं.
महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान
महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान.