AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराण युद्धात भारताला मोठा दणका, हाहाकाराला सुरूवात, थेट 25 लाख लोक…

इराण आणि अमेरिका युद्धात जगातील अनेक देश होरपळत आहेत. या युद्धाचा फटका सर्वांनाच बसत आहे. स्थिती अधिक गंभीर होत आहे. यादरम्यानच आता भारताची झोप उडवणारा रिपोर्ट पुढे आला, ज्याने एकच खळबळ उडाली.

इराण युद्धात भारताला मोठा दणका, हाहाकाराला सुरूवात, थेट 25 लाख लोक...
Iran India
| Updated on: Apr 14, 2026 | 3:25 PM
Share

इराण आणि अमेरिका युद्धाचा फटका जगाला बसत आहे. आखाती देशांचीही वाट लागली. ज्या ज्या देशात अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, अशा ठिकाणी मोठे हल्ले इराणकडून करण्यात आले. कतारच्या गॅस प्रकल्पावरही इराणने हल्ला केला. आखाती देशात भारतीय लोक मोठ्या संख्येने नोकऱ्या करतात, या युद्धामुळे त्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या. अनेकांनी आखाती देश सोडले. या युद्धाची झळ भारताला बसली आहे. भारतात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला. परिणामी सरकारकडून व्यावसायिक गॅस सिलेंडर वितरण बंद करण्यात आले. सिलेंडर मिळत नसल्याने हॉटेल बंद ठेवण्याची वेळ हॉटेल चालकांवर आली. भारतात कच्च्या तेलाची काही समस्या नाही. पण एलपीजी गॅसचा तुटवडा आहे. सरकारकडून यातून मार्ग काढला जात आहे.

मध्य पूर्वेतील युद्धाचा परिणाम भारतात स्पष्टपणे जाणवत आहे. यादरम्यान संयुक्त राष्ट्राने धक्कादायक रिपोर्ट दिला. या रिपोर्टमुळे भारताची झोप उडाली. संयुक्त राष्ट्राच्या रिपोर्टनुसार, भारतातील 25 लाख लोक गरीबीमध्ये ढकलले जाऊ शकतात. देशाच्या मानव विकासाच्या प्रगतीमध्ये या युद्धामुळे मोठा अडथळा येण्याची शक्यता आहे. भारताला याचा फटका बसताना दिसत आहे.

हॉटेल बंद असल्याने हजारोंच्या घरात लोक बेरोजगार झाली आहेत. जर हे युद्ध अधिक काळ चालले तर याचा भयंकर परिणाम भारतावर होऊ शकतो. इंधनाची कमी, भाडे, कच्चे तेलावर करण्यात येणारी प्रक्रिया यामुळे सरकारच्या बजेटवर दबाव येत आहे. फक्त हेच नाही तर जागतिक बाजारात तेलाच्या वाढलेल्या किमतीमुळे ताण येत आहे.

88 लाख लोक गरीबीच्या खाईत ढकलले जाऊ शकतात, असा खळबळजनक दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला. रिपोर्टनुसार, भारतासाठी ही अत्यंत मोठी आणि धोक्याची घंटा आहे. परिस्थिती अधिक चिघळताना दिसत आहे. युद्धाची झळ सर्वच देशांना बसताना दिसत आहे. पाकिस्तानमध्ये लॉकडाऊनची स्थिती आहे. रात्री आठनंतर मॉल बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला. होर्मुज खाडीतून भारतात जहाज त्या तुलनेत कमी दाखल होत आहेत. त्यामध्येच विदेशात असलेल्या लोकांच्या नोकऱ्याही जात आहेत.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?