AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! 12 भारतीय खलाशी असलेल्या जहाजावर इराणचा हल्ला, आखातात खळबळ

Iran Attack on Ship : इराणने ओमानजवळ 12 भारतीय कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या एमटी चिरॉन या केमिकल टँकरवर हल्ला केला आहे. आता सर्व भारतीय खलाशी सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.

मोठी बातमी! 12 भारतीय खलाशी असलेल्या जहाजावर इराणचा हल्ला, आखातात खळबळ
Attack on TankerImage Credit source: Google
| Updated on: Apr 27, 2026 | 5:02 PM
Share

इराण आणि अमेरिकेतील युद्धामुळे जागतिक पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. आखाती देशांमधून येणाऱ्या जहाजांवर निर्बंध घालण्यात आले आहेत, त्यामुळे जहाज वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. परवानगीशिवाय होर्मुझमधून प्रवास करणाऱ्या जहाजांवर हल्ला करण्याची धमकीही इराणकडून देण्यात आली होती. त्यानंतर इराणी लष्कराने काही जहाजांवर हल्ला देखील करण्यात आला आहे. अशातच आता आखातातून मोठी बातमी समोर आली आहे. इराणने 12 भारतीय खलाशी असलेल्या एका तेल टँकरवर हल्ला केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भारतीय खलाशी असलेल्या जहाजावर हल्ला

समोर आलेल्या माहितीनुसार, इराणकडून टोगो देशाच्या केमिकल टँकरवर हल्ला करण्यात आला आहे. या जहाजावर 12 भारतीय कर्मचारी होते. या केमिकल टँकरचे नाव MT Chiron असे असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना ओमानमधील शिनासच्या बंदर हद्दीजवळ घडली. हे जहाज इतर जहाजांसोबत प्रवास करत असताना इराणी कोस्ट गार्डने त्याला अडवले आणि इशारा म्हणून गोळीबार केला. या घटनेनंतर भारतीय कर्मचारी सुरक्षित आहेत अशी माहिती नौवहन मंत्रालयाने दिली आहे.

यु्द्धाबाबत तोडगा निघालेला नाही

गेल्या काही काळापासून इराण आणि अमेरिका यांच्या युद्धबंदीचा निर्णय झालेला आहे. मात्र युद्ध अद्याप थांबलेले नाही. दोन्ही देशांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. इराण आणि अमेरिका अशा दोन्ही देशांकडून एकमेकांना ऑफर दिल्या जात आहेत, मात्र यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये पाकिस्तानात चर्चाही झाली होती, मात्र अद्याप अंतिम तोडगा निघालेला नाही.

इराणचा अमेरिकेला प्रस्ताव

समोर आलेल्या माहितीनुसार, इराणने अमेरिकेसमोर एक नवा प्रस्ताव ठेवला आहे. याच सर्वप्रथम होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यात यावी आणि युद्ध संपवण्यासाठी पावले उचलली जावी असे नमूद करण्यात आले आहे. तर अणु कार्यक्रमाच्या मुद्द्यावरची चर्चा नंतर करण्यात यावी असही या प्रस्तावात नमूद करण्यात आलेले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सध्या अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे इराणला आधी तुलनेने सोप्या मुद्द्यांवर सहमती घडवून आणून लवकर करार करायचा आहे आणि त्यानंतर अणु मुद्द्यावर चर्चा पुढे न्यायची आहे अशी माहिती समोर आली आहे.

Follow Us
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...
मराठीच्या वादात राज ठाकरेंची एन्ट्री, थेट रस्त्यावर उतरणार....
मराठीच्या वादात राज ठाकरेंची एन्ट्री, थेट रस्त्यावर उतरणार.....
मराठी सक्तीवर निरुपमांचा यू-टर्न; अंमलबजावणी पुढे ढकलण्याची....
मराठी सक्तीवर निरुपमांचा यू-टर्न; अंमलबजावणी पुढे ढकलण्याची.....
राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेत नेमकं कोण जाणार? मोठी अपडेट समोर
राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेत नेमकं कोण जाणार? मोठी अपडेट समोर.
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणुकीच्या मैदानाबाहेर?
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणुकीच्या मैदानाबाहेर?.