AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता या 6 व्या दोस्तासाठी इराणने उघडला होर्मुझ मार्ग, आधी भारतासह 5 देशांना दिली मोकळीक

इराणने म्हटले आहे की होर्मुझ सामुद्रधुनी केवळ शत्रूंच्या जहाजांसाठी बंद आहे. इतर सर्वासाठी होर्मुझ सामुद्रधुनी सदैव खुली आहे असे इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अरागची यांनी म्हटले आहे.

आता या 6 व्या दोस्तासाठी इराणने उघडला होर्मुझ मार्ग, आधी भारतासह 5 देशांना दिली मोकळीक
Hormuz
| Updated on: Mar 26, 2026 | 10:34 PM
Share

इराणच्या युद्धामुळे जगात हाहाकार उडालेला आहे. इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्याने अनेक देश अडचणीत आले आहेत. या मार्गातूनच जगातील २० टक्के इंधन पुरवठा केला जात आहे. हा मार्ग लवकरच सुरु करण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरु आहेत.या स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून इराणने आतापर्यंत भारत, रशिया, चीन, इराक आणि पाकिस्तान या पाच देशांच्या जहाजांना प्रवासाची सुट दिली आहे. आता आणखी एका देशाला होर्मुझ पार करण्याची परवानगी इराणने दिली आहे.

स्ट्रेट ऑफ होर्मुझ सामुद्रधुनीत इराणने नाकाबंदी करुन अनेक युरोपीय देशांसह अन्य काही देशांच्या जहाजांवर हल्ले केले आहेत. त्यामुळे या चिंचोळ्या मार्गावर इराणने एक प्रकारे टोल वसुली सुरु केली आहे. या सामुद्रधुनीतून आतापर्यंत पाच देशांच्या जहाजांना परवानगी दिली आहे. यात भारत, रशिया, चीन, इराक आणि पाकिस्तानला सुट देण्यात आली होती. आता सहावा देश मलेशियाला येथून जहाज नेण्याची मंजूरी देण्यात आली आहे.

मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी गुरुवारी सांगितले की त्यांच्या जहाजांना इराणने होर्मुझ स्ट्रेटमधून प्रवास करण्याची मूभा दिली आहे. अन्वर इब्राहिम म्हणाले की त्यांनी इराण, इजिप्त, तुर्की आणि क्षेत्रातील अन्य देशांच्या नेत्यांशी बातचीत केली आहे. या चर्चेमुळे इराणने मलेशियाच्या जहाजांना होर्मुझ येथून प्रवास करण्यास मंजरी दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. टेलिव्हीजनवर दिलेल्या एका मुलाखतीत अन्वर इब्राहिम यांनी आमच्या जहाजांना प्रवास करण्यास मंजूरी दिल्याबद्दल इराणच्या राष्ट्राध्यक्षांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले आम्ही आता मलेशियन तेल टँकर आणि त्यांचे कर्मचाऱ्यांना मुक्त करण्याच्या प्रक्रियेत व्यस्त आहोत.ज्यामुळे त्यांच्यातील कर्मचारी सुरक्षित घरी येतील.

शांततेसाठी चर्चा करणार मलेशिया –

रॉयटर वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार अन्वर इब्राहिम यांनी सांगितले की मध्य पूर्वेत शांतता प्रस्थापित करम्यच्या प्रयत्नाचा भाग म्हणून आपण इराण आणि अन्य देशांशी बोललो आहोत. ते पुढे म्हणाले की पण हे सोपे नाही. कारण इराणला वाटते की त्यांच्यासोबत वारंवार धोका झालेला आहे.ते म्हणाले इराणच्या सुरक्षे संदर्भात कोणतीही गॅरंटी दिली जात नसल्याने इराण शांततेच्या दृष्टीने कोणतेही पाऊल उचलण्यास कचरत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

इराणचे परराष्ट्र मंत्री अरागची काय म्हणाले ?

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची म्हणाले की आम्ही होर्मुझ स्ट्रेटमधून पाच जहाजांना जाण्याची परवानगी दिली आहे. त्यांच्या मते भारत, चीन, रशिया, इराक आणि पाकिस्तानच्या जहाजांना जाण्याची परवानगी दिली आहे. या देशांनी त्यांच्या जहाजांना सुरक्षित जाण्याची परवानगी मागितली होती. त्यानंतर इराणच्या मदतीने ते होर्मुझमधून सुरक्षित बाहेर निघाले. अरागची म्हणाले होर्मुझ सामुद्रधुनी केवळ शत्रूंसाठी बंद असून बाकी सर्वांसाठी ती खुली आहे.

Follow Us
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?