AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्धविराम होताच डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केला इराणच्या हल्ल्याचा तो व्हिडीओ, नव्या वादाला तोंड फुटणार?

इराण आणि इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध अमेरिकेच्या हस्तक्षेपाने संपले. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ "बॉम्ब इराण" या गाण्यासह शेअर केला. या व्हिडिओमुळे वाद निर्माण झाला आहे. अमेरिकेच्या हल्ल्यांचा इराणच्या अणु सुविधांवर किती परिणाम झाला याबाबत विरोधाभासी अहवाल आहेत. ट्रम्प यांनी दोन्ही देशांवर टीका केली आहे.

युद्धविराम होताच डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केला इराणच्या हल्ल्याचा तो व्हिडीओ, नव्या वादाला तोंड फुटणार?
Donald Trump
| Updated on: Jun 25, 2025 | 9:15 AM
Share

गेल्या १२ दिवसांपासून इराण आणि इस्रायल यांच्यात सुरु असलेले युद्ध अखेर थांबले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायल यांच्यात शस्त्रसंधी झाल्याची घोषणा केली आहे. या दरम्यान अमेरिकेने इराणवर हल्ला केला होता. त्यानंतर आता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओला त्यांनी Bomb Iran हे गाणे जोडले आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी रात्री त्यांच्या Truth Social या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये B-2 स्टील्थ फायटर जेट्स बॉम्ब टाकताना दिसत आहेत. त्याला 1980 च्या दशकातील वादग्रस्त Bomb Iran हे गाणे जोडले आहे. या गाण्यातून राजकीय आणि धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचा आरोप आहे. कारण या गाण्यात मशिदीत जाऊन दगडफेक करू, अयातुल्लाला डब्यात बंद करू! बॉम्ब इराण अशा ओळी आहेत.

इराणवरील हल्ले आणि ट्रम्प यांचे विधान

ट्रम्प यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये B-2 स्टील्थ बॉम्बर्सनी इराणवर हल्ला केल्याचे दाखवले आहे. या विमानांनी इराणच्या महत्त्वाच्या अणू ठिकाणांवर हल्ले केला. यात फोर्डो फ्युएल एनरिचमेंट प्लांट आणि नतांझ एनरिचमेंट कॉम्प्लेक्सवर, 14 GBU-57 बंकर बस्टर बॉम्ब टाकले असल्याचा दावा आहे. अमेरिकेने इस्फहान येथील इराणच्या अणु केंद्रालाही लक्ष्य केले होते. ट्रम्प यांनी इराण, अमेरिका आणि इस्त्राईल यांच्यातील तणाव वाढलेला असताना हा व्हिडीओ शेअर केला आहे. अमेरिकेने इराणच्या अणू ठिकाणांवर लष्करी हल्ले केल्यानंतर ही परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे.

इराण आणि इस्त्राईल यांच्यात शस्त्रसंधी लागू

या हल्ल्यानंतर व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी इराण आणि इस्त्राईल या दोन्ही देशांवर टीका केली. ते म्हणाले, “दोन देश इतक्या वाईट रीतीने लढत आहेत की त्यांना स्वतःलाही कळत नाहीये की ते काय करत आहेत.” एका ताज्या अमेरिकन अहवालानुसार, अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांचा इराणवर विशेष परिणाम झालेला नाही. मात्र, व्हाईट हाऊसने हा दावा फेटाळून लावला आहे. ट्रम्प यांनी आधी दावा केला होता की, अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणची ताकद पूर्णपणे संपली आहे. सध्या इराण आणि इस्त्राईल यांच्यात शस्त्रसंधी लागू आहे. अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या प्राथमिक अहवालात म्हटले आहे की, हल्ल्यांमुळे इराणची अणू ठिकाणे पूर्णपणे नष्ट झाली नाहीत. अमेरिकेने फोर्डो, नतांझ आणि इस्फहान येथे हल्ले केले होते.

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.