AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran-Israel War : जगाची तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल? लेबनॉनमधील फ्रेंच कंपन्यांवर इस्त्रायलाचा जोरदार हल्ला

Iran-Israel War : इस्त्रायलने लेबनॉनची राजधानी बैरुत येथे फ्रान्सच्या आंतरराष्ट्रीय कंपनीवर जोरदार बॉम्ब वर्षाव केला. त्यामुळे आता या युद्धाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि इस्त्रायलचे पंतप्रधान यांच्यात शा‍ब्दिक चकमक सुरू आहे.

Iran-Israel War : जगाची तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल? लेबनॉनमधील फ्रेंच कंपन्यांवर इस्त्रायलाचा जोरदार हल्ला
इस्त्रायलचा फ्रेंच कंपनीवर हल्ला
| Updated on: Oct 06, 2024 | 10:38 AM
Share

हमास, हिजबुल्लाह आणि इराण या तिकडीसोबत इस्त्रायलने जोरदार आघाडी उघडली आहे. त्यातच आता इस्त्रायलने फ्रान्सला पण मोठा धक्का दिला आहे. लेबनॉन येथील फ्रान्सच्या आंतरराष्ट्रीय कंपनीवर त्यांनी जोरदार बॉम्ब वर्षाव केला. टोटलएनर्जी या फ्रेंच कंपनीला इस्त्रायलच्या गुप्तहेर कंपनीने लक्ष्य केले आहे. त्यामुळे आता या युद्धाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात आणि इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यात शा‍ब्दिक चकमक सुरू आहे.

इस्त्रायलने केला हवाई हल्ला

याविषयीच्या वृत्तानुसार, बैरूत येथील दक्षिण उपनगरात फ्रांसीसी कंपनी Total Energies वर इस्त्रायलने जोरदार हवाई हल्ला चढवला. वृत्तानुसार, या हल्ल्यानंतर या परिसरात मोठी आग लागली. या हल्ल्यात कोणी जखमी अथवा ठार झाल्याचे समोर आलेले नाही. लेबनॉन प्रश्नात फ्रेंच सरकार कायम दुटप्पी धोरण राबवत असल्याचा आरोप इस्त्रायलने केला आहे.

मॅक्रॉन-नेतन्याहू यांच्यात बाचाबाची

गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात बाचाबाची सुरू आहे. आम्ही इराणच्या वाईट वृत्तीविरोधात, त्यांच्या हडेलहप्पी धोरणाविरोधात लढत असताना सर्व चांगल्या राष्ट्रांनी आमच्या पाठीशी राहावं असं आवाहन नेतन्याहू यांनी केले होते. त्याचवेळी मॅक्ऱॉन यांनी इस्त्रायलवर शस्त्रास्त्र प्रतिबंध लावण्याचा निर्णय घेतला. त्यावरून दोघांमध्ये खडाजंगी सुरू आहे. त्याचाच राग मनात धरून इस्त्रायलने फ्रेंच कंपनीला टार्गेट केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

फ्रान्स इस्त्रायलच्या पाठीशी

शस्त्र देण्यावर बंदी घातल्याने इस्त्रायलचा तिळपापड झाला आहे. फ्रान्सच्या या निर्णयावर नेतन्याहू हे भडकले आहेत. त्यांनी या निर्णयाचा आणि मॅक्रॉन यांचा जोरदार निषेध नोंदवला. त्यांनी अशा परिस्थिती निर्णय घेतल्याने त्यांना लाज वाटायला हवी अशी टोकाची भाषा नेतन्याहू यांनी वापरली. तर दुसरीकडे आपण इस्त्रायलच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचा दावा फ्रान्सने केला आहे. उद्या जर इराणने इस्त्रायलवर हल्ला केला तर फ्रान्स इस्त्रायलच्या पाठीशी उभा राहिल, असं फ्रान्सने स्पष्ट केलं.

इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.