AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bachhu Kadu : एकनाथ शिंदेंनी आम्हाला एक घाव दिला, आता आम्ही…बच्चू कडू यांचं मुख्यमंत्र्यांना खुलं आव्हान

Bachhu Kadu to CM Eknath Shinde : महायुतीमधून बच्चू कडू बाजूला झाले. त्यांनी राजू शेट्टी यांच्या मदतीने तिसऱ्या आघाडीचा प्रयोग हाती घेतला आहे. विधानसभेपूर्वी ताकद वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहेत. त्यातच त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी शिवसेनेकडून त्यांच्याविरोधात उभा ठाकण्याची शक्यता आहे.

Bachhu Kadu : एकनाथ शिंदेंनी आम्हाला एक घाव दिला, आता आम्ही...बच्चू कडू यांचं मुख्यमंत्र्यांना खुलं आव्हान
बच्चू कडू यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर 'प्रहार'
| Updated on: Oct 06, 2024 | 10:38 AM
Share

महायुतीशी बच्चू कडू यांनी काडीमोड घेतला. तिसऱ्या आघाडीच्या जोरावर ते राज्यात वेगळं काही घडवण्याच्या विचारात आहेत. अर्थात महाविकास आघाडीचा त्यांच्यावर विश्वास नाही. तर महायुतीने त्यांच्या मतदारसंघात अडचणींचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी शिवसेनेकडून त्यांच्याविरोधात उभा ठाकण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडींमुळे बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं आहे.

ही भाजप-शिवसेनेची खेळी

राजकुमार पटेल यांच प्रहार पक्ष सोडण ही भाजप शिवसेनेची खेळी आहे, असा आरोप बच्चू कडू यांनी केला. अजूनही दोन तीन महत्त्वाचे कार्यकर्ते जे जाण्याची शक्यता असल्याचा गौप्यस्फोट त्यांनीच केला.आम्हाला लढण्याची सवय आहे. आधी एक होतो आताही एक आहे. पुन्हा लढू आणि एकाचे दहा निवडणूक आणू. निवडणूक मध्ये हरलो तरी चालेल पण विचारासोबत तडजोड नाही. प्रत्येकाच वैयक्तिक स्वार्थ असत ते त्यांनी करावं. ते तिथे जात आहे त्यांनी तिथे सुखी राहाव.राजकुमार पटेल यांनी सांगितलं की दोस्ती कायम राहील तर आम्ही दोस्ती कायम ठेवून राजकुमार पटेल विरोधात उमेदवार देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.

विदर्भात झटका दाखवू

भाजप आणि शिवसेना जी खेळत आहे, त्याचा झटका त्यांना विदर्भात दिसेल, असा इशारा कडू यांनी दिला. प्रत्येकाचा राजकीय स्वार्थ असतो त्यामुळे ते जात असेल त्याची आम्हाला परवा नाही आहे त्यांनी सुखात राहावं. राजकुमार पटेल आणि माझे मतभेद असूच शकत नाही राजकुमार पटेल अतिशय दिलदार माणूस आहे. त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी केलेलं हे काम आहे, असे ते म्हणाले.

आता आम्ही हजारो घाव देऊ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला एक घाव केला आम्ही त्याच्या बदल्यात हजारो घाव देऊ. शिंदे गटाला सुद्धा याचे परिणाम भोगायला लावू. त्यांनी एक खेळी खेळली आम्ही दहा खेडी खेळू. त्याचे परिणाम शिंदे गटाला भोगायला लावू अशी भूमिका आम्ही घेऊ, असे कडू यांनी आव्हान दिलं. आम्ही सुद्धा मैत्री कायम ठेवून राजकुमार पटेल यांच्या विरोधात उमेदवार देऊ. आमचे काही पदाधिकारी व आम्हाला आणखी सोडून जातील काही लोक राजकीय हेतूने काही आर्थिक हेतूने सोडून जातील. एकनाथ शिंदे यांनी आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिलं त्याचं ऋण आमच्यात कायम आहे. पण त्यांनी खेळलेली खेळी त्यांनाच त्यांना घातक ठरणार आहे.

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.