AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran Israel war: शातीर निघाले खामेनेई! म्हणून इच्छा असून इस्रायलला त्यांना संपवता आलं नाही, कसे वाचले?

इस्रायलचे संरक्षण मंत्री काट्झ यांनी खुलासा केला आहे की इस्रायलने इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु खामेनेईच्या उत्कृष्ट सुरक्षा व्यवस्थेमुळे तो प्रयत्न अयशस्वी झाला. खामेनेई हे जमीनीखाली असलेल्या बंकरमध्ये लपले होते. त्यांनी नवीन अधिकाऱ्यांशीही संपर्क तोडला.

Iran Israel war: शातीर निघाले खामेनेई! म्हणून इच्छा असून इस्रायलला त्यांना संपवता आलं नाही, कसे वाचले?
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 27, 2025 | 2:56 PM
Share

इस्रायलने इराणच्या सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येचा प्रयत्न केला होता. परंतु खामेनेईंच्या चतुर बुद्धीमुळे इस्रायल आपल्या डावात यशस्वी होऊ शकले नाही. हा खुलासा खुद्द इस्रायलचे संरक्षणमंत्री योआव गॅलंट यांनी केला आहे. गॅलंट यांच्या म्हणण्यानुसार, खामेनेई यांना मारण्यासाठी आम्ही सर्व आघाड्या उघडल्या होत्या, पण यश मिळाले नाही. इस्रायलच्या चॅनेल-12 ला दिलेल्या मुलाखतीत गॅलंट म्हणाले की, पहिल्या दिवसापासून आमची योजना खामेनेई यांना मारून इराणला मोठा धक्का देण्याची होती, पण खामेनेई चतुर निघाले आणि ते लपून बसले.

नवीन अधिकाऱ्यांशी संपर्क तोडला

गॅलंट यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेने जरी असे विधान केले की आम्ही खामेनेई यांना मारू इच्छित नाही, तरी आम्हाला त्यांना मारण्यासाठी कोणत्याही देशाच्या परवानगीची गरज नव्हती. जेव्हा आम्ही इराणच्या लष्करी कमांडरांना मारले, तेव्हापासून खेळ बिघडला. खामेनेई यांनी मारल्या गेलेल्या लष्करी अधिकाऱ्यांच्या जागी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. आम्हाला अशी आशा होती की या नवीन अधिकाऱ्यांमार्फत खामेनेई यांच्या ठिकाणाची माहिती मिळेल, पण संपूर्ण युद्धात खामेनेई यांनी नवीन अधिकाऱ्यांशी संपर्कच ठेवला नाही. हेच ते कारण होते की आमच्या लोकांना खामेनेई यांचे ठिकाण शोधता आले नाही, ज्यामुळे ते वाचले.

वाचा: पाकच्या महिला एजंटनं जाळं टाकलं, फक्त 50 हजारात देशाशी गद्दारी; भारताचं मोठं सिक्रेट फोडलं!

वली-ए-अम्रच्या देखरेखीखाली बंकरमध्ये खामेनेई

13 जून रोजी इस्रायलच्या हल्ल्यांना इराणमध्ये सुरुवात होताच खामेनेई तेहरानजवळील एका बंकरमध्ये गेले. इराण इंटरनॅशनलच्या मते, खामेनेई यांनी आपली सुरक्षा विशेष सुरक्षा दल वली-ए-अम्रच्या हवाली केली. वली-ए-अम्रला इराणमधील सर्वात मजबूत सुरक्षा दल मानले जाते. या संघटनेत सुमारे 12,000 जवान आहेत. जे सुप्रीम लीडरच्या सुरक्षेसाठी तयार केले गेले आहेत. असे म्हटले जाते की, बंकरमध्ये लपल्यानंतर खामेनेई यांनी आपल्या लोकांशी केवळ प्रत्यक्ष भेटी घेतल्या. म्हणजेच, त्यांच्या सुरक्षारक्षकांनी फोनचा वापर पूर्णपणे बंद केला.

अ‍ॅक्सिओसच्या अहवालानुसार

अ‍ॅक्सिओसने अमेरिकन बंकर बस्टर बॉम्ब हल्ल्यानंतर एक अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालात असे म्हटले आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना बॉम्ब हल्ल्यापूर्वी खामेनेई यांच्याशी करारासाठी सहमती हवी होती. पण इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियन यांनी सुप्रीम लीडरशी त्यांचा संपर्क नसल्याचे सांगत हा प्रस्ताव नाकारला गेला.

सरपंच हत्येप्रकरणी मोठी अपडेट आल्यानंतर धनंजय देशमुख यांची मागणी काय?
सरपंच हत्येप्रकरणी मोठी अपडेट आल्यानंतर धनंजय देशमुख यांची मागणी काय?.
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्....
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा.
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका.
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य.
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना.
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.