AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्ध थांबवण्यासाठी इराणची सर्वात मोठी अट! होर्मुझबाबत मोठी मागणी; डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेकडे जगाचे लक्ष

Iran vs US : युद्ध संपवण्यासाठी इराणने अमेरिकेसोबत चर्चेसाठी सशर्त सहमती दर्शवली आहे. मात्र यासाठी इराणने अमेक महत्त्वाच्या अटी समोर ठेवल्या आहेत. याबाबचत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

युद्ध थांबवण्यासाठी इराणची सर्वात मोठी अट! होर्मुझबाबत मोठी मागणी; डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेकडे जगाचे लक्ष
Iran vs us ConditionImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 29, 2026 | 6:28 PM
Share

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगाची झोप उडालेली आहे. अशातच आता हे युद्ध संपवण्यासाठी इराणने अमेरिकेसोबत चर्चेसाठी सशर्त सहमती दर्शवली आहे. ही चर्चा पाकिस्तानमार्फत करण्याचा प्रस्ताव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इराण चर्चेसाठी तयार आहे, मात्र त्याने काही महत्त्वाच्या अटी मांडल्या आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाची अट म्हणजे त्याच्यावर सुरू असलेले हल्ले तात्काळ थांबवले जावेत आणि अमेरिका तसेच इस्रायल यांनी भविष्यात कोणताही हल्ला करणार नाहीत, याची हमी द्यावी. आता डोनाल्ड ट्रम्प हे नेमका काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

इराण चर्चेसाठी तयार, पण…

समोर आलेल्या माहितीनुसार, युद्ध थांबवण्याच्या या मुद्द्यावर 29-30 मार्च रोजी पाकिस्तावातील इस्लामाबाद येथे उच्चस्तरीय बैठक होणार आहे. या बैठकीत पाकिस्तान, सौदी अरेबिया, तुर्की आणि इजिप्त सहभागी होणार आहेत. या देशांदरम्यानच्या चर्चेत मध्यस्थीचा रोडमॅप तयार केला जाईल. इराणने यापूर्वी अमेरिकेने सुचवलेला 15 सूत्रीय करार नाकारला होता. आता इराणने 5 अटी अमेरिकेने मान्य केल्यासच पुन्हा चर्चा करण्यास सहमती दर्शविली आहे.

इराणच्या प्रमुख अटी

  • तात्काळ सर्व हल्ले थांबवले जावेत
  • भविष्यात हल्ले न करण्याची हमी दिली जावी
  • पाकिस्तान, सौदी अरेबिया, तुर्की आणि इजिप्त यांनी हमी द्यावी की अमेरिका इराणच्या मुद्द्यांना गांभीर्याने ऐकेल
  • इराणला होर्मुज सामुद्रधुनीवर पूर्ण नियंत्रण हवे आहे

पाकिस्तानकडून युद्धबंदीसाठी प्रयत्न

पाकिस्तानने इराण आणि अमेरिकेतील युद्ध थांबवण्यासाठी आपले राजनैतिक प्रयत्न अधिक वेगवान केले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियन यांच्याशी फोनवर चर्चा करून तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा दिली आहे. तसेच पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी अमेरिकेसोबतच्या बैठकीबाबत चर्चा केली. आता इस्लामाबादमध्ये तुर्की, इजिप्त आणि सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत बैठक होणार आहे होत आहे, ज्यामध्ये सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असून हे युद्ध थांबवण्याचे मार्ग शोधले जाणार आहेत.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...