AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोसादच्या गुप्तहेरांचा खेळ खल्लास? इराण करतंय भयंकर काम, आता इस्रायलचा गेम होणार?

इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध आता चांगलेच पेटले आहे. आता इराणने मोसादच्या गुप्तहेरांना संपवण्याची मोहीम चालू केली आहे.

मोसादच्या गुप्तहेरांचा खेळ खल्लास? इराण करतंय भयंकर काम, आता इस्रायलचा गेम होणार?
iran action against israel mossad
| Updated on: Jun 18, 2025 | 4:39 PM
Share

Iran And Israel War : इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा भडका उडाला आहे. हे दोन्ही देश एकमेकांवर मोठे हल्ले करत आहेत. दरम्यान, सध्या इस्रायल इराणमधील अनेक महत्त्वाच्या स्थळांवर तसेच इराणाच्या राजधानीलाही लक्ष्य करताना दिसतंय. आता मात्र इराणनेही इस्रायलला जशास तसं उत्तर देण्याचं ठरवलंय. मिळाळेल्या माहितीनुसार इराणकडून इस्रायलच्या मोसाद या गुप्तहेर संघटनेच्या गुप्तहेरांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात झाली आहे.

30 सैन्यअधिकाऱ्यांना केलं ठार

इस्रायलने काही दिवसांपूर्वी इराणच्या लष्करी तळांवरत सेच उर्जानिर्मिती करणाऱ्या अणूउर्जा प्रकल्पांवर बॉम्बगोळे फेकले होते. त्याशिवया इस्रायलने इराणच्या जवळपास 30 सैन्यअधिकाऱ्यांना ठार केलंय. यातील बरेच हल्ले हे इस्रायलने इराणमध्ये असलेल्या आपल्या एजंट्सच्या माध्यमातूनच केले आहेत. इस्रायलचे हे गुप्तहेर इराणसाठी चांगीलच डोकेदुखी ठरले आहेत.

38 संशयित गुप्तहेरांना पकडले

आता इस्रायलच्या याच गुप्तहेरांच्या मुसक्या आवळण्याची मोहीम आता इराणने हाती घेतली आहे. इराणकडून या गुप्तहेरांचा कसून शोध घेतला जात आहे. इराणने आतापर्यंत अशा 38 संशयित गुप्तहेरांना पकडले आहे. या लोकांनी इस्रायलसाठी इराणमध्ये जासुसी केल्याचा आरोप आहे. आगामी काळात या कारवाईत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मोसादचा कारखाना केला उद्ध्वस्त

रविवारी म्हणजेच 15 जून रोजी इराणने इस्रायलच्या मोसाद या बलशाली गुप्तहेर संघटनेच्या दोन गुप्तहेरांना अटक केलं. इराणमधील माध्यमांनुसार बॉम्ब, स्फोटक साहित्य, इलेकट्रॉनिक उपकरणं तयारी केली, असा आरोप या दोघांवर आहे. सोमवारी म्हणजेच 16 जून रोजी तेहरानच्या आजूबाजूला मोसादशी संबंधित असलेला एक गुप्त बॉम्ब कारखाना ध्वस्त केला. या ठिकाणी 200 किलो स्फोटकं, 23 ड्रोन, लॉन्च प्लॅटफॉर्म्स, तसेच आत्मघाती ड्रोन सापडले, असे इराणच्या सुरक्षा संस्थांनी म्हटले आहे.

बुधवारी म्हणजेच 18 जून रोजीदेखील इराणने इस्रायच्या मोसाद या गुप्तहेर संघटनेचे 5 संशयित गुप्तहेर ताब्यात घेतले आहेत. ऑनलाईन पद्धतीने इराणची प्रतिमा मलीन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दरम्यान, अजूनही इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांतील संघर्ष अद्याप संपलेला नाही. 13 जून रोजी इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर हा संघर्ष पेटला असून आगामी काळात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.