बायका म्हणजे…पुरुषांनी त्यांना…इस्रायलसोबत युद्ध चालू असताना इराणच्या खामेनींच्या त्या विधानाची चर्चा; काय म्हणाले होते?
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे महिलांविषयी असलेल्या विचारांची आता नव्याने चर्चा होत आहे.

Israel And Iran War : इराण आणि इस्रायल यांच्यात सध्या युद्ध चालू आहे. नुकतेच इस्रायलने इराणवर हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यात इराणचे सैन्यातील अनेक मोठे अधिकारी मारले गेले आहेत. त्यानंतर आता इराणही इस्रायलला जशास तसं उत्तर देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, एकीकडे इराणचा इस्रायलसोबत टोकाचा संघर्ष चालू असताना दुसरीकडे इराणचे सर्वोच नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या महिलांबाबत व्यक्त केलेल्या एका मताची सध्या जगभरात चर्चा होत आहे.
खामेनी इराणचे सर्वोच्च अधिकारी
अयातुल्ला अली खामेनी हे इराणचे सर्वोच्च नेते आहेत. इस्रायलसोबत चालू असलेल्या सध्याच्या युद्धादरम्यान त्यांच्या आदेशाला सर्वोच्च समजून तेथील लष्कर कारवाई करत आहेत. काहीही झालं तरी आम्ही इस्रायलला शरण येणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतलीय. इराणमधील जनतेच्या मनात खामेनी यांच्यासाठी मोठं स्थान आहे. याच खामेनी यांनी एक्स या समाजमाध्यमावर महिलांविषयी काही मतं व्यक्त केली होती. त्यांचे काही जुने ट्विट सध्या सोशल मीडियावर नव्याने शेअर केले जात असून खामेनी यांच्या महिलांविषयीचत्या मतांची सध्या जगभरात चर्चा होत आहे.
Women are stronger than men. Women can completely control and influence men with their wisdom and delicacy. May 11, 2013
— Khamenei.ir (@khamenei_ir) March 7, 2018
पुरुषांनी महिलांच्या….
सध्या खामेनी यांनी 2013 साली केलेल्या काही ट्विट्सची चर्चा होत आहे. या ट्विट्समध्ये त्यांनी महिलांविषयी त्यांची मतं मांडली आहेत. महिलांच्या गरजा ओळखणे, त्यांच्या भावना समजून घेणे ही पुरुषांवर असलेली जबाबदारी आहे. महिलांच्या भावनिक स्थितीकडे पुरुषांनी दुर्लक्ष करू नये, असं खामेनी यांनी 2013 सालच्या एका ट्विटमध्ये म्हटलंय.
Woman is a flower.How evil of a man to treat a flower w/ violence and w/out appreciation.18/9/2000 #ViolenceAgainstWomen
— Khamenei.ir (@khamenei_ir) November 25, 2013
महिला म्हणजे फुल आहेत, त्यांना…
तसेच महिला या पुरूषांपेक्षा अधिक खंबीर असतात. महिला त्यांच्याकडे असलेल्या शहाणपणा तसेच हळवेपणाच्या मदतीने पुरुषांवर नियंत्रण ठेवू शकतात, पुरुषांवर प्रभाव पाडू शकतात, असं खामेनी 11 मे 2013 रोजीच्या एका ट्विटमध्ये म्हणाले होते. महिला या फुलासारख्या असतात. त्यामुळे अशा फुलांना पुरुष हे हिंसाचार तसेच त्यांचे कौतुक न करता स्त्रियांना कसे काय वागवू शकतात? असा प्रश्न खामेनी यांनी 2013 सालच्या एका ट्विटमध्ये केला होता.
खामेनी यांनी एका ट्विटमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरी यांच्या पुस्तकाचाही उल्लेख केलेला आहे. दरम्यान, आता इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध चांगलेच पेटले आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.