Iran vs Israel : ‘यावेळचा हल्ला खूप खतरनाक असेल, तुम्ही…’, इराणच इस्रायलला ओपन चॅलेंज
Iran vs Israel : इराणने इस्रायलला खुली धमकी दिली आहे. इराणची जागतिक पातळीवर मोठी नाचक्की झाली आहे. कारण इस्रायलने त्यांच्या घरात घुसून राजधानी तेहरानमध्ये हमासचा प्रमुख इस्माइल हानियाला संपवलं. ते ही राष्ट्रपतींच्या घरापासून फक्त 150 मीटर अंतरावर. इराणच्या नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी झाल्यानंतर दुसऱ्याचदिवशी हे घडलं.

राजधानी तेहरानमध्ये इस्रायलने हमासचा प्रमुख इस्माइल हानियाला संपवल्याने इराणची जागतिक स्तरावर मोठी नाचक्की झाली आहे. इराणचा तिळपापड झाला असून हल्ल्यानंतर इराणकडून सातत्याने बदला घेण्याची धमकी दिली जात आहे. एका मीडिया हाऊसने आपल्या लेखात म्हटलय की, यावेळी इराण इस्रायलच्या आतील भागांना, शहरांना टार्गेट करेल. आधी जो हल्ला केला, त्यापेक्षा मोठा हल्ला असेल. तेल अवीव आणि हायफा सारख्या शहरांना टार्गेट केलं जाईल.
सुप्रीम लीडर आयतुल्लाह अली खामेनेई यांच्याकडून काहान वर्तमानपत्र प्रकाशित केलं जातं. मागच्यावेळी ऑपरेशनमध्ये इराणने फक्त काही ठिकाणांना लक्ष्य केलं. आता इस्रायलच्या आतील भाग तेल अवीव आणि हायफा सारख्या शहरांना लक्ष्य केलं जाईल. हानियाच्या हत्येत सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांच्या घरांना लक्ष्य केलं जाईल. यावेळचा हल्ला खूप खतरनाक असेल, इंटरसेप्ट करण शक्य होणार नाही असं लेखात म्हटलं आहे.
अमेरिकेकडून काय घोषणा?
आखाती क्षेत्रात तणाव प्रचंड वाढला आहे. अमेरिका मध्य पूर्वेत फायटर जेटची स्क्वाड्रन तैनात करणार आहे अशी पेंटागनने शुक्रवारी घोषणा केली. इस्रायलच संरक्षण आणि अमेरिकन सैन्याच्या मदतीसाठी अतिरिक्त क्रूजर आणि विध्वंसक जहाज तैनात करण्यात येईल. यूएसएस अब्राहम लिंकन विमानवाहू युद्धनौका मध्य पूर्वेत यूएसएस थियोडोर रूजवेल्टची जागा घेईल.
अमेरिका कोणाविरोधात मोर्चा उघडणार?
अमेरिकेने इराणने ज्या दहशतवादी संघटना उभ्या केल्यात, त्यांच्या विरुद्ध मोर्चा उघडला आहे. अमेरिकेने 12 वॉरशिप तैनात केल्या आहेत. यात भूमध्य सागरात 4 युद्धनौका उभ्या आहेत. इराणने इस्रायल आणि अमेरिकेविरोधात ज्या दहशतवादी संघटना उभ्या केल्या आहेत, त्यांच्यावर अमेरिकेकडून हल्ला होऊ शकतो.
