इस्रायलचा इराणच्या सरकारी न्यूज चॅनलवर हल्ला, बुलेटीन सोडून अँकर पळाली, Video
इस्रायलने इराणवर आणखी एक मोठा हल्ला केला आहे. यावेळी इस्रायलने इराणच्या सरकारी न्यूज चॅनलला लक्ष्य केलं. इस्रायलकडून इराणचं सरकारी चॅनल असलेल्या IRIB वर हल्ला करण्यात आला.

इस्रायलने इराणवर आणखी एक मोठा हल्ला केला आहे. यावेळी इस्रायलने इराणच्या सरकारी न्यूज चॅनलला लक्ष्य केलं. इस्रायलकडून इराणचं सरकारी चॅनल असलेल्या IRIB वर हल्ला करण्यात आला. बुलेटीन सुरू असताना हा हल्ला झाला. हल्ला होताच बुलेटीन वाचत असलेल्या अँकरने घटनास्थळावरून पळ काढला. इस्रायलने इराणच्या सरकारी चॅनलवर हल्ला केला आहे, सोबतच अशी धमकी देखील दिली आहे की, आम्ही इराणमधील सर्व चॅनल आणि रेडिओ केंद्रांवर हल्ला करू.
इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरूच आहे. त्यामुळे मध्यपूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. इराणने आज इस्रायलची राजधानी तेल अवीव आणि प्रमुख बंदर असलेल्या हाइफा या दोन मोठ्या शहरांवर हल्ला केला. त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून इस्रायलकडून देखील तेहरानवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये इस्रायलने इराणच्या सरकारी चॅनलच्या कार्यालयाला लक्ष केलं. बुलेटीन सुरू असतानाच हा हल्ला झाला. हल्ला झाल्यानंतर बातमी वाचत असलेल्या अँकवर तेथून पळण्याची वेळ आली. याचा एक व्हिडीओ देखील आता समोर आला आहे.
इस्रायलने इराणवर आणखी एक मोठा हल्ला केला आहे. इराणच्या सरकारी चॅनलचं कार्यालय इस्रायलकडून लक्ष्य करण्यात आलं, याचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे की, बुलेटीन सुरू आहे. बातम्या वाचल्या जात आहेत, त्याचदरम्यान त्या ठिकाणी मोठा हल्ला झाला. हल्ला होताच अँकर तेथून पळाल्याचं दिसून येत आहे.
🚨#فوری صدا و سیمای حکومت اسلامی رو زدن pic.twitter.com/3pzGz9Kb80
— Edvin (@EdvinFarhadG) June 16, 2025
इराणकडून युद्धविरामाची तयारी
दरम्यान इराणकडून आता युद्धविरामाचे संकेत देण्यात आले आहेत. इराणच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थांमार्फत अमेरिका आणि इस्रायला संदेश पाठवला आहे. मात्र त्यासाठी त्यांनी एक अट देखील घातली आहे, की जर इस्रायलने हल्ले थांबवले तर आम्ही देखील तातडीनं सैन्य कारवाई थांबवू असं इराणने म्हटलं आहे. इस्रायलने इरणावर केलेल्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत इराणचं मोठं नुकसान झालं आहे. त्यानंतर आता इराणकडून युद्धविरामाचे संकेत देण्यात आले आहेत. तसा प्रस्ताव अमेरिका आणि इस्रायलकडे पाठवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.