AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुतण्याच ठरणार खामेनींचा कर्दनकाळ? एक विधान करून उभं केलं मोठं संकट? आता इस्रायल…

Iran Isreal War Update : इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध चालू असताना आता खामने यांच्या पुतण्यानं मोठी विधानं केली आहेत.

पुतण्याच ठरणार खामेनींचा कर्दनकाळ? एक विधान करून उभं केलं मोठं संकट? आता इस्रायल...
ayatollah-ali-khamenei-imahmoud-moradkhanimage
| Updated on: Jun 19, 2025 | 3:39 PM
Share

Iran Isreal War : इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा भडका उडाला आहे. दोन्ही देश एकमेकांना संपवण्यासाठी पूर्ण ताकदीने हल्ले करत आहेत. रोज बॉम्बगोळे, क्षेपणास्त्र यांचा पाऊस पाडला जोताय. दरम्यान, इस्रायलविरोधात दोन हात करत असताना इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचाच पुतण्या त्यांच्याविरोधात दंड थोपटून उभा ठाकला आहे. खामेनी यांच्या पुतण्याने इराणमधील सत्ता उलथवून लावायला पाहिजे, असं विधान करत एका प्रकारे इस्रायलला पाठिंबाच दिला आहे.

खामेनी यांच्या धोरणावर सडकून टीका

अयातुल्ला अली खामेनी हा इराणचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांच्या भाच्याचे नाव महमूद मोरादखानी असे आहे. सध्या महमूद मोरादखानी यांनी अयातुल्ला अली खामेनी यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. ते खामेनी यांच्या धोरणावर सडकून टीका करत आहेत. सध्या ते फ्रान्समध्ये वास्तव्यास आहेत. मात्र फ्रान्समध्ये राहूनही गेल्या अनेक वर्षांपासून ते खामेनी यांच्या धोरणांना कठोर विरोध करतात. आता इराणचा इस्रायलविरोधात संघर्ष चालू झाल्यानंतर मोरादखानी यांनी खामेनी यांचा विरोध जास्तच तीव्र केल आहे.

मी युद्धाच्या विरोधात आहे मात्र…

मुरादखानी यांचे उत्तर फ्रान्समध्ये घर आहे. या घरात त्यांनी एक मुलाखत दिली आहे. याच मुलाखतीत त्यांनी इराण-इस्रायल यांच्यातील संघर्षष खामेनी यांचे धोरण यावर त्यांचे मत व्यक्त केले आहे. मी युद्धाच्या विरोधात आहे. मात्र सध्या इराणमधील सत्तेचा पाडाव होणे हाच एकमेव मार्ग शिल्लक आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलंय.

मोरादखानी यांनी 1986 साली इराण देश सोडला होता. तेव्हापासून ते फ्रान्समध्ये वास्तव्यास आहेत. त्यांनी दिलेल्या याच ताज्या मुलाखतीची संपूर्ण जगात चर्चा होत आहे. त्यांनी या मुलाखतीत खामेनी यांच्या धोरणाचा कठोर विरोध केला आहे. “इराणधील सध्याच्या सत्तेला संपूष्टात आणने गरजेचे आहे. कारण त्याशिवाय आता कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. सध्याची परिस्थितीच तशी झाली आहे,” असं मोरादखानी यांनी म्हटलंय. इराणचं सध्याचं नेतृत्त्व हे नमते घ्यायला तयार नाही. तसेच या नेतृत्त्वाला कोणतीही सुधारणा नको आहे. त्यामुळे इराणमध्ये सध्या बदल घडून येणे फारच गरजेचे आहे, असे त्यांचे मत आहे.

इराणच्या सत्तेचा पाडाव करणे गरजेचे

इराणच्या लोकांना स्वातंत्र्य हवंय. येथील लोकांना आणखी चांगलं राहणीमान हवंय. मला युद्ध नको आहे. पण इराणच्या सत्तेचा पाडाव करणे गरजेचे आहे, असे मोरादखानी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आता मोरादखानी यांच्या या मतामुळे इराणची जनता नेमकं काय भूमिका घेते? मोरादखानी यांच्या या विधानांमुळे इस्रायल-इराण युद्धावर काही परिणाम पडणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.