Israel : हमासचा नवीन चीफ रस्त्यावर उतरताच इस्रायलने फक्त 3 सेकंदात खेळ संपवला, काय केलं?
Israel : मंगळवारची मुदत संपल्यानंतरही इस्रायली सैन्य दक्षिण लेबनानमध्ये पाच रणनितीक ठिकाणी कायम राहिल, असं एका इस्रायली अधिकाऱ्याने सांगितलं. नोव्हेंबरमध्ये युद्धविरामाचा करार झाला. त्या अंतर्गत इस्रायली सैन्य माघारी फिरणार होतं.

दक्षिण लेबनानच्या रस्त्यावर सोमवारी हमास चीफ खुलेआम, बिनधास्त फिरत होता. या दरम्यान एका इस्रायली ड्रोनने हमास चीफ मोहम्मद शाहीनच अवघ्या तीन सेकंदात काम तमाम केलं. युद्धविराम करारातंर्गत इस्रायलला दक्षिण लेबनानमधून पूर्णपणे मागे हटायचं होतं, त्यावेळी हा हल्ला झाला. इस्रायल आणि हिज्बुल्लाहमध्ये 14 महिने चाललेल युद्ध संपवण्यासाठी हा करार करण्यात आला होता. इस्रायली सैन्याने लेबनानमध्ये हमासच्या ऑपरेशन्सचा प्रमुख मोहम्मद शाहीनला संपवलं. अलीकडे लेबनानी क्षेत्रातून इस्रायली नागरिकांवर हल्ले झाले, त्यामागे मोहम्मद शाहीनचा हात असल्याचा आरोप इस्रायलने केला. मोहम्मद शाहीनने केलेल्या हल्ल्यांना इराणच समर्थन होतं, असा दावा इस्रायली सैन्याने केला. हमासने शाहीनच्या मृत्यूची पुष्टी करताना त्याला एक सैन्य कमांडर ठरवलं.
हल्ल्यानंतर समोर आलेल्या फुटेजमध्ये एका कारला आगीच्या ज्वाळांनी वेढलेलं. इस्रायलला जानेवारी अखेरपर्यंत दक्षिण लेबनानमधून पूर्णपणे मागे हटायचं होतं. पण ही मर्यादा 18 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली. इस्रायली सैन्य मंगळवारपर्यंत पूर्णपणे मागे हटणार की, नाही? ते स्पष्ट नाहीय. युद्धविराम असूनही इस्रायल दक्षिण आणि पूर्व लेबनानमध्ये हल्ले करत आहे. जिथे मिसाइल आणि अन्य सैन्य उपकरण आहेत तसच दहशतवादी लपलेल्या ठिकाणांना आम्ही लक्ष्य करतोय असं इस्रायलच म्हणणं आहे.
कुठे इस्रायली सैन्य कायम राहणार?
दुसऱ्याबाजूला लेबनानचा आरोप आहे की, इस्रायलला जाणूनबुजून त्यांची भूमी आपल्या ताब्यात ठेवायची आहे. म्हणून ते सैन्य माघारीला वेळ लावत आहेत. मंगळवारची मुदत संपल्यानंतरही इस्रायली सैन्य दक्षिण लेबनानमध्ये पाच रणनितीक ठिकाणी कायम राहिल, असं एका इस्रायली अधिकाऱ्याने सांगितलं. नोव्हेंबरमध्ये युद्धविरामाचा करार झाला. त्या अंतर्गत इस्रायली सैन्य माघारी फिरणार होतं. लेबनानच्या सरकारने इस्रायली सैन्य माघारीला होणाऱ्या विलंबाला कडाडून विरोध केला आहे.
की या क्षेत्रात नवीन संघर्ष होणार
या घटनेनंतर इस्रायल आणि लेबनानमध्ये तणाव वाढू शकतो. लेबनानने आधीच संयुक्त राष्ट्राकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. आमच्या सुरक्षेला प्राधान्य देत आम्ही आवश्यक पावलं उचलत राहणार असं इस्रायलने म्हटलं आहे. इस्रायल ठरलेल्या मुदतीत सैन्याला माघारी बोलावणार का? की या क्षेत्रात संघर्षाची नवीन स्थिती उदभवणार