AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel Iran War : अमेरिका जे करायला घाबरतेय ते इस्रायल करुन दाखवणार, शपथच घेतली, संरक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा

Israel Iran War : इस्रायल इराण युद्ध आता भीषण वळणावर येऊन ठेपलय. काही गोष्टी आता कोणाच्याही हातात राहिलेल्या नाहीत. अमेरिका अजूनही या युद्धापासून लांब आहे. फक्त ते धमक्या देत आहेत. दुसऱ्याबाजूला इस्रायल रणांगणात लढतोय. आता इस्रायलने एक मोठा निर्णय घेतला. निर्णयापेक्षा ती शपथच आहे.

Israel Iran War : अमेरिका जे करायला घाबरतेय ते इस्रायल करुन दाखवणार, शपथच घेतली, संरक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा
iran israel war
| Updated on: Jun 19, 2025 | 4:08 PM
Share

अमेरिकेकडून सध्या फक्त धमक्यांची भाषा सुरु आहे. डोनाल्ड ट्रम्प तेहरान रिकामी करा, वैगेर अशा धमक्या देत आहेत. पण या युद्धात उतरायचं की नाही, याबद्दल अमेरिकेत अजून तरी एकमत दिसत नाहीय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सगळ्या जगामध्ये आपणच कसे तारणहार आहोत, अशी शेखी मिरवत आहेत. पण त्यांना अजून रशिया-युक्रेन युद्ध थांबवता आलेलं नाही. फक्त श्रेय घेण्यासाठीचा त्यांचा सगळा खटाटोप दिसून येतो. इस्रायल-इराण युद्धात उतरण्याआधी अमेरिका खूप सावध पावलं टाकत आहे. दुसऱ्याबाजूला इस्रायल आपल्या लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करतोय. अमेरिका अजूनही जे करायला घाबरतेय ते इस्रायलने जाहीर केल. इस्रायलने तशी शपथच घेतली आहे.

मध्य इस्रायलच्या बीर्शेबा रुग्णालयावर इराणने आज हल्ला केला. या हल्ल्यानंतर संरक्षण मंत्री कॅट्ज यांनी मोठी घोषणा केली आहे. आता इराणचा सुप्रीम लीडर खामेनेईला सोडणार नाही, त्याला मारणार अशी कॅट्ज यांनी घोषणा केली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी बदला घेण्याची शपथ घेतली आहे, त्यानंतर कॅट्ज यांचं हे वक्तव्य आलय. द जेरूसलेम पोस्टनुसार इस्रायलचे संरक्षण मंत्री कॅट्ज म्हणाले की, “रुग्णालयावरील हल्ल्यासाठी थेट खामेनेई जबाबदार आहेत. त्यामुळे पुढचं टार्गेट तेच असतील. हा एक युद्ध गुन्हा आहे. त्याची खामेनेईला शिक्षा मिळेल”

त्यासाठी आम्हाला काहीही करावं लागलं तरी चालेल

इराण हायपरसोनिक मिसाइल्सचा वापर करत आहे. यावरुन एक गोष्ट स्पष्ट आहे, तो सुधरणार नाही. आता आम्ही नव्या पद्धतीने इराणवर हल्ला करु असं इस्रायलचे संरक्षण मंत्री कॅट्ज म्हणाले. “आम्ही खामेनेईची राजवट हादरवणार. त्यासाठी आम्हाला काहीही करावं लागलं तरी चालेल. इस्रायलवरील सर्व संभाव्य हल्ले संपवण्याच्या दिशेने आम्ही काम करत आहोत” असं कॅट्ज म्हणाले. “इराणचा दहशतवादी हुकूमशाह (अयातुल्ला अली खामेनेई) च्या सैनिकांनी सरोका रुग्णालय आणि नागरिक वस्त्यांवर हल्ले केले. आता इराणला याची किंमत चुकवावी लागेल” असं नेतन्याहू यांनी एक्सवर लिहिलय. इस्रायली अधिकाऱ्यांनुसार, या हल्ल्यात 6 जण गंभीररित्याज जखमी झाले आहेत. 20 पेक्षा जास्त लोक किरकोळ जखमी झाले आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.