‘हा’ देश सदैव भारताच्या पाठिशी, पाकिस्तान, चीनचे धाबे दणाणले

इस्त्रायलचे राजदूत रॉन मालका यांनी 17 डिसेंबर रोजी घोषणा करत, इस्त्रायल नेमही मित्र म्हणून भारतासोबतच राहील, अशी घोषणा केली आहे. सुरक्षेसंबंधी भारताला जेव्हा आपली गरज लागेल, तेव्हा आपण भक्कमपणे भारताच्या पाठिशी उभे राहू, असंही त्यांनी म्हटलंय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 7:50 AM, 29 Dec 2020
'हा' देश सदैव भारताच्या पाठिशी, पाकिस्तान, चीनचे धाबे दणाणले

नवी दिल्ली: भारत आणि इस्त्रायल देशांमधील मैत्रिपूर्ण संबंध संपूर्ण जगाला माहिती आहेत. गेल्या 30 वर्षांमध्ये या दोन्ही देशांच्या मैत्रीने नवी उंची गाठली आहे. आता इस्त्रायलच्या राजदूतांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर पाकिस्तान आणि चीनचे धाबे दणाणले आहेत. ‘काहीही झालं तर इस्त्रायल भारताला आपला मिलिस्ट्री सपोर्ट देत राहील,’ असं इस्त्रायलचे राजदूत रॉन मालका यांनी म्हटलंय. गेल्या ८ महिन्यांपासून लाईन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल (LAC)वर भारत आणि चीन सैन्यात युद्धजन्य स्थिती आहे. दुसरीकडे पाकिस्तानही भारतात घुसखोरी करण्याचा आणि दहशतवादी हल्ले घडवण्याचा प्रयत्न करत आहे. अशावेळी इस्त्रायलच्या राजदुतांनी केलेलं हे वक्तव्य पाकिस्तान आणि चीनची चिंता वाढवणारं आहे. (Israel’s full military support to India, a warning to China-Pakistan)

इस्त्रायलचे राजदूत रॉन मालका यांनी 17 डिसेंबर रोजी घोषणा करत, इस्त्रायल नेमही मित्र म्हणून भारतासोबतच राहील, अशी घोषणा केली आहे. सुरक्षेसंबंधी भारताला जेव्हा आपली गरज लागेल, तेव्हा आपण भक्कमपणे भारताच्या पाठिशी उभे राहू, असंही त्यांनी म्हटलंय. महत्वाची बाब म्हणजे इस्त्रायली राजदुतांनी हे वक्तव्य अशावेळी केलं आहे. जेव्हा युनायडेट अरब अमिराती, सूदान आणि मोरक्को यांसारख्या देशांनी इराणसोबत राजनैतिक संधंब दृढ केले आहेत. त्याबरोबर येणाऱ्या काही दिवसात सौदी अरबही याबाबत निर्णय घेऊ शकतो. अशास्थितीत पाकिस्तान पूर्णपणे एकाकी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

‘कुणाविरुद्ध नाही पण भारतासोबत’

चीन आणि भारतामध्ये असलेल्या युद्धजन्य स्थितीत भारताकडून कुठल्या सुरक्षा उपकरणांची मागणी झाली आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना मालका यांनी सांगितलं की, इस्त्रायल आणि भारतामध्ये एक मजबूत मैत्री आहे. अशावेळी भारताला जेव्हा गरज भासेल तेव्हा इस्त्रायल भारतासोबत ठामपणे उभा असेल. अशारितीनेच मित्रता पुढे नेली जाते, जेव्हा खास करुन ती भारतासारख्या देशांबरोबर असते. आम्ही कुणाच्या विरुद्ध नाही, पण भारतासोबत आहोत, असा दावाही मालका यांनी केला आहे.

संबंधित बातम्या:

चिन्यांना विमानात पाय ठेवू देऊ नका, भारताने का उचललंय हे मोठं पाऊलं, वाचा सविस्तर…

असं काय घडतंय की, मित्र असलेल्या रशियाची पाकिस्तानशी जवळीक वाढतेय?

Israel’s full military support to India, a warning to China-Pakistan