असं काय घडतंय की, मित्र असलेल्या रशियाची पाकिस्तानशी जवळीक वाढतेय?

आता भारताच्या या मित्र देशाची पाकिस्तानसोबत जवळीक वाढत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे भारताच्या रशियासोबतच्या संबंधांसाठी हे आव्हान मानलं जात आहे.

असं काय घडतंय की, मित्र असलेल्या रशियाची पाकिस्तानशी जवळीक वाढतेय?
Follow us
| Updated on: Dec 26, 2020 | 7:56 PM

नवी दिल्ली : भारत आणि रशिया या दोन्ही देशांमध्ये मागील 6 दशकांपासून जवळचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मात्र, आता भारताच्या या मित्र देशाची पाकिस्तानसोबत जवळीक वाढत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे भारताच्या रशियासोबतच्या संबंधांसाठी हे आव्हान मानलं जात आहे. रशियाची पाकिस्तानसोबतची जवळीक पाहून भारताच्या सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणा देखील हैराण आहेत. असं असलं तरी रशियाकडून पाकिस्तानसोबतच्या संबंधांमुळे भारताच्या संबंधांवर परिणाम होणार नाही, असं सांगण्यात आलंय. आपले संबंध दोन्ही देशांसोबत कोणत्याही बंधनाशिवाय आहे, असंही रशियाने म्हटलंय (Know reasons behind India’s close ally Russia is getting closer to Pakistan).

भारतातील रशियाचे राजदूत रोमन बाबूशकिन म्हणाले, “रशिया कोणत्याही प्रकराच्या संवेदनशील मुद्द्याचा सन्मान करतो. मात्र, रशियाचा पाकिस्तानसोबतच्या संबंधांचा दृष्टीकोन कोणत्याही बंधनापलिकडचा आहे. पाकिस्तानसोबत रशियाचा द्विपक्षीय व्यापार करार आहे आणि दोन्ही देशांमध्ये एक आर्थिक अजेंडा देखील आहे.” पाकिस्‍तान शंघाई को-ऑपरेशन ऑर्गनायजेशनमधील एक प्रमुख देश आहे. रशिया आणि पाकिस्‍तानमध्ये या वर्षी जुलैमध्ये 1,100 किलोमीटर लांब पाईपलाईनच्या निर्मितीची सुरुवात झाली होती. या पाईपलाईनमुळे पाकिस्‍तानला अधिक प्रमाणात नॅचरल गॅस मिळणार आहे.

‘गॅस पाईपलाईनमध्ये पाकिस्तानचा वाटा 54-74 टक्के’

पाकिस्तानचे पेट्रोलियम मंत्रालयाचे सल्लागार नदीम बाबर यांनी एका मुलाखतीत म्हटलं, “या प्रकल्पात पाकिस्तानची भागिदारी 54 ते 74 टक्के असेल. उर्वरित भागीदारी रशियाची असेल. मागील काही दिवसांपूर्वी रशियाचे उप-राजदूत भारतातील माध्यमांशी बोलताना म्हणाले होते, “रशिया पाकिस्‍तानसह जगातील अन्य देशांशी आपले संबंध आणि सहकार्य वाढवत असताना प्रत्येक महत्त्वाच्या सिद्धांताचं पालन करतो.” पाकिस्‍तान आणि रशियात यादरम्यान पाचवी संयुक्त लष्करी कवायतही झाली. ‘फ्रेंडशिप-2020’ नावाच्या या कवायतीत दोन्ही देशांचे 150 सैनिक सहभागी झाले होते. 2016 पासून ही सैन्य कवायत दरवर्षी आयोजित केली जाते.

भारतासाठी हे संबंध अलर्ट का?

एकिकडे रशिया आणि पाकिस्तान दोन्ही देशांमधील सैन्य संयुक्त सराव करत आहे, तर दुसरीकडे भारत आणि चीनमध्ये सीमेवर तणावाची स्थिती आहे. त्यामुळे भारतासाठी ही चिंता करण्यासारखी परिस्थिती असल्याचं मत जाणकार व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे रशिया आणि पाकिस्तानमधील संबंध वाढण्यामध्ये चीनचाही वाटा असल्याचं बोललं जातंय. रशियाने आपल्या सीमा भागातील प्रकल्पांमध्ये अधिक गुंतवणूक करावी यासाठी चीनकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. चीनच्या या महत्त्वकांक्षी प्रकल्पांमध्ये बॉर्डर रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय) आणि सीपीईसी प्रोजेक्‍ट्सचा समावेश आहे. रशियाने या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक वाढवली तर हा भारतासाठी मोठा झटका असणार आहे.

हेही वाचा :

पुतीन यांची सर्वात मोठी चाल, खून, चोरी किंवा षडयंत्र, काहीही केलं तरी आजन्म संरक्षण

दोस्त पुन्हा मदतीला आला, पुढच्या वर्षी 30 कोटी लस देणार?

रशियातील कोरोनाची लस घेण्यासाठी ‘ही’ अट; नागरिकांना सक्तीच्या सूचना

Know reasons behind India’s close ally Russia is getting closer to Pakistan

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.