Jammu & Kashmir: कुलगाम चकमकीत 4 दहशतवादी ठार, कारवाई सुरू

कारवाई सुरू असल्याचे काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले. प्रतिबंधित दहशतवादी संघटना TRF चा दहशतवादी कमांडर अफाक सिकंदरला गोपालपोरा येथे ठार केल्याची माहिती आहे.

Jammu & Kashmir: कुलगाम चकमकीत 4 दहशतवादी ठार, कारवाई सुरू
Representative Image


काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील दोन गावांमध्ये मोठी दहशतवादविरोधी कारवाई सुरू आहे. कुलगाम जिल्ह्यातील पोंबाई आणि गोपालपोरा गावात बुधवारी झालेल्या चकमकीत किमान 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या दोन्ही गावांमध्ये कारवाई सुरू असल्याचे काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले. प्रतिबंधित दहशतवादी संघटना TRF चा दहशतवादी कमांडर अफाक सिकंदरला गोपालपोरा येथे ठार केल्याची माहिती आहे.

याआधी मंगळवारी जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील हैदरपोरा भागात झालेल्या चकमकीत एक पाकिस्तानी दहशतवादी आणि त्याच्या साथीदाराचा खात्मा करण्यात आला.

दरम्यान, पुलवामा पोलीस आणि सुरक्षा दलांनी मोठी दुर्घटना टळली आहे. LeT चे दोन दहशतवादी सहकारी अमीर बशीर आणि मुख्तार भट यांना नाका तपासणीदरम्यान अटक करण्यात आली. झडतीदरम्यान, त्यांच्याकडून दोन रेडी IED जप्त करण्यात आले.

इतर बातम्या-

Kulbhushan Jadhav: अखेर, कुलभूषण जाधव यांना अपील करण्याचा अधिकार मिळाला, पाकिस्तानच्या संसदेत विधेयक मंजूर

Video: शिवराजसिहांना रोखलं तर योगींना पायी चालवलं? मोदींसोबतचे हे दोन video का चर्चेत? काँग्रेसकडून ट्विट

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI