Operation Sindoor : शेवटी पाकिस्तानात एक संपादक खरं बोलला, हे मुनीर, आफ्रिदीच्या कानाखाली मारण्यासारखं
Operation Sindoor : पाकिस्तानात सध्या खोट्या विजयाचे ढोल बडवले जात आहेत. पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी, सैन्याने तिथल्या जनतेला खोटी, चुकीची माहिती दिलीय, त्याचं हे सेलिब्रेशन आहे. या सगळ्यामध्ये एका पाकिस्तानी संपादकाने खरं बोलण्याची हिम्मत दाखवली आहे. हे पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीर आणि शाहिद आफ्रिदीच्या कानाखाली मारण्यासारखं आहे.

भारताशी सीजफायर झाल्यानंतर पाकिस्तानात जोरदार सेलिब्रेशन सुरु झालं आहे. हे सीजफायरच सेलिब्रेशन नाहीय. तिथे खोट्या विजयाचे ढोल बडवले जात आहेत. पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी, सैन्याने तिथल्या जनतेला खोटी, चुकीची माहिती दिलीय, त्याचं हे सेलिब्रेशन आहे. भारताविरोधात गरळ ओकणारा शाहीद आफ्रिदी या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झालाय. अनेक ठिकाणी लष्करप्रमुख असीम मुनीरच्या समर्थनार्थ घोषणाबाजी होत आहे. पाकिस्तानात हे असले जे माकडचाळे सुरु आहेत, त्यात एका माणसाने खरं बोलण्याची हिंम्मत दाखवली आहे. त्याने पाकिस्तान सरकार आणि सैन्याची पोलखोल केली आहे.
पाकिस्तानच्या एका वरिष्ठ पत्रकाराने संपादकीय लिहून पोलखोल केली आहे. वरिष्ठ पत्रकार अब्बास नासिर यांनी डॉन वर्तमानपत्रात एक लेख लिहिलाय. “विजयाबद्दल पाकिस्तानात सेलिब्रेशन सुरु आहे. पण पाकिस्तान सरकारच्या चेहऱ्यावर कानफटात बसली आहे, त्याकडे ते दुर्लक्ष करतायत” असं नासिर यांनी लिहिलं आहे.
भारताने पाकिस्तानला धुतलं हे नासिर यांनी स्पष्टपणे सांगितल. ते डॉन वर्तमानपत्राचे माजी संपादक आहेत. तीन पॉइंटमध्ये समजून घ्या, त्यांनी काय लिहिलय
1 नासिर यांच्यानुसार भारताचा सर्जिकल स्ट्राइक आधी बालाकोट किंवा POK पर्यंत असायचा. पण यावेळी हल्ला पंजाबमध्ये झालाय. भारताने रफिकी, नूर बेस, मुरीद सारख्या मिलिट्री बेसना टार्गेट केलय. लाहोर पर्यंत येऊन भारताने एअर डिफेन्स सिस्टिम उद्धवस्त केली.
2 भारताच्या स्ट्राइकसमोर पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टिम संपूर्णपणे फेल झाली हे नासिर यांनी मान्य केलय. पाकिस्तानच सीजफायरचे प्रयत्न करत होता, हे नासिर यांनी सांगितलं. या गोष्टीकडे भारत लक्ष वेधणार. पाकिस्तानी मंत्र्यांनी हल्ल्या दरम्यान जी वक्तव्य केली, त्याने पाकिस्तानला मानसिक झटका बसला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी शस्त्र संधीची घोषणा करताच परराष्ट्र मंत्र्यांनी यावर प्रतिक्रिया दिली. यामधून पाकिस्तानला तात्काळ शस्त्रसंधी हवी होती, हा संदेश गेला.
3 दोन्ही देशांमध्ये आता चर्चा कुठे होणार? हे अजून स्पष्ट नाहीय. पण दहशतवादाची चर्चा होणार. भारत हा मुद्दा यूएनपर्यंत घेऊन जाणार. पाकिस्तानसाठी हे संकेत चांगले नाहीत असं अब्बास नासीर यांनी लिहिलय.
