बलात्कारापासून वाचण्यासाठी चौथ्या मजल्यावरून उडी; तरीही आरोपीने सोडला नाही पाठलाग, चाकू हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी

बलात्कारापासून वाचण्यासाठी चौथ्या मजल्यावरून उडी; तरीही आरोपीने सोडला नाही पाठलाग, चाकू हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी
प्रातिनिधिक छायाचित्र

बलात्कारापासून वाचण्यासाठी एका तरुणीने चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारली, मात्र तरी देखील आरोपीने या तरुणीचा पाठलाग सोडला नाही. आरोपीने तरुणीचा पाठलाग करून तिच्यावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यामध्ये तरुणी गंभीर जखीम झाली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Dec 11, 2021 | 1:34 PM

मॉस्को : बलात्कारापासून वाचण्यासाठी एका तरुणीने चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारली, मात्र तरी देखील आरोपीने या तरुणीचा पाठलाग सोडला नाही. आरोपीने तरुणीचा पाठलाग करून तिच्यावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यामध्ये तरुणी गंभीर जखीम झाली आहे. चाकू हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. ही घटना रशियामधील असून, याप्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. टॉलीबचोन अमीनोव असे या 28 वर्षीय आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान आरोपीने संबंधित तरुणीसोबतच आणखी दोन मुलींना देखील बंदक बनवले होते. पोलिसांनी त्यांची सुटका केली आहे.

तीन तरुणींना केले किडनॅप

जखमी तरुणीने दिलेल्या माहितीनुसार आरोपी एका इमारतीमध्ये रिनोव्हेशनचे काम करण्यासाठी आला होता. याच इमारतीमध्ये या तीनही मुली वास्तव्याला होत्या. आरोपीने तीनही मुलींना किडनॅप करून, एका घरात कोंडून ठेवले. मात्र संधी मिळताच आपण चौथ्या मजल्यावरून उडी मारत आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती या तरुणीने दिली आहे. आरोपीने इतर दोन तरुणींवर बलात्कार देखील केला असल्याचा आरोप चाकूहल्ला झालेल्या तरुणीने केला आहे.

घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

दरम्यान ही घटना तीथे लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून , सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीने असे का केला, त्याच्यावर आणखी देखील काही गुन्हे आहेत का? याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संबंधित बातम्या

Nashik| दारूड्या मुलाने आईला ढकलले, 65 वर्षीय वृद्धा झोपेतच गतप्राण; चटका लावणारी घटना…

पुण्यात बांधकाम व्यवसायिकांने थेट म्हाडालाच गंडवले; शासकीय योजनेच्या फायद्यासाठी केली फसवणूक ; गुन्हा दाखल

scam: आदिवासी महामंडळ नोकरभरती घोटाळ्यात 2 बड्या अधिकाऱ्यांवर 5 वर्षांनी गुन्हा, राजकीय पदाधिकाऱ्याला अभय

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें