Polaris Dawn : सुनीता विलियम्सना परत आणण्याची जबाबदारी असलेल्या SpaceX ची मोठी झेप, एकदा हे वाचा
SpaceX Polaris Dawn : 'पोलारिस डॉन' हे जगातील पहिलं प्रायवेट स्पेसवॉक असलेलं मिशन होतं. एलन मस्क यांची एयरोस्पेस कंपनी स्पेसएक्सने हे मिशन प्रत्यक्षात आणलं. एकूणच अवकाश संशोधनाच्या दृष्टीने हे मिशन किती महत्त्वाच होतं? त्यामागे काय उद्दिष्टय होती? भविष्यात त्यामुळे काय फायदा होणार? अमेरिकेची सर्वोच्च अवकाश संशोधन संस्था नासा यामागे काय विचार करते? हे या लेखातून जाणून घ्या.

Polaris Dawn Spacewalk : आपल्या सभोवतालच विश्व म्हणजे निर्सग. हवा, पाणी आणि जमीन हे निसर्गामधले महत्त्वाचे घटक. आज पृथ्वीवर या तिन्ही गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने आपण मोकळा श्वास घेऊ शकतो. अनेक नावीन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात आणू शकतो. जसं आपल्या सभोवतालच विश्व म्हणजे निर्सग, तसं पृथ्वीच्या सभोवतालच विश्व म्हणजे अवकाश. या अवकाशाने नेहमीच मानवी मनात कुतूहल निर्माण केलय. या अवकाशाकडे पाहून अनेक प्रश्न मनात जन्म घेतात. माणूस त्याच्या सवयीप्रमाणे या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. त्यातल्या काही प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. काही उत्तरं अजूनही अनुत्तरित आहेत. अवकाशाबद्दल अजूनही अनेक रहस्य कायम आहेत. ही रहस्य उलगडण्याचा, शोधण्याचा प्रयत्न कायम आहे. ...
