AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel-Hamas | इस्रायल युद्धात होरपळतोय, पण या महिलेची का होतेय चर्चा?, कोण आहे ही महिला?; असं काय केलंय तिने?

इस्रायल युद्धाने पोळून निघाला आहे. हमासने ध्यानीमनी नसताना इस्रायलवर भयंकर हल्ला केला. या हल्ल्यात शेकडो इस्रायली नागरिक मारले गेले. त्यामुळे इस्रायलमध्ये भीतीचं वातावरण असतानाच येथील एका महिलेचं मात्र जग कौतुक करत आहे. कोण आहे ही महिला?....

Israel-Hamas | इस्रायल युद्धात होरपळतोय, पण या महिलेची का होतेय चर्चा?, कोण आहे ही महिला?; असं काय केलंय तिने?
Inbar LiebermanImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 13, 2023 | 7:42 AM
Share

तेल अवीव | 13 ऑक्टोबर 2023 : इस्रायलविरोधात हमासने युद्ध पुकारलं आहे. त्यामुळे इस्रायलच नव्हे तर जगभर खळबळ उडाली. हमासच्या अतिरेक्यांनी घराघरात घुसून सामान्य नागरिकांचा खात्मा करण्यास सुरुवात केली. अतिरेक्यांनी इस्रायलचे पोलीस आणि आर्मी बेस उद्ध्वस्त केले. सामान्य नागरिक आणि लष्करातील जवानांना ओलीस धरले. सरकारी मालमत्तेची नासधूस केली. त्यामुळे इस्रायलमध्ये हाहा:कार उडाला. नागरिक हल्ल्याच्या भीतीने तळघरात लपून बसले. कुणी नातेवाईकांकडे आश्रय घेतला तर कुणी आणखी कुठे… इतकं सारं होत असताना इस्रायलच्या एका महिलेची मात्र सर्वत्र चर्चा होत आहे. जगभर या महिलेचा बोलबाला सुरू आहे. तिचं कौतुक सुरू आहे. कोण आहे ही महिला? असा काय केलं तिने?

इनबार लिबरमॅन असं या महिलेचं नाव आहे. लिबरमॅन ही अवघ्या 25 वर्षाची आहे. दिसायला प्रचंड सुंदर आहे. पण जग तिच्या सौंदर्यामुळे तिचं कौतुक करत नाहीये तर तिच्या शौर्यामुळे तिचं कौतुक करत आहे. इनबार लिबरमॅन ही इस्रायलची शूर महिला सैनिक आहे. तिने हमासच्या अतिरेक्यांच्या हल्ल्यापासून आपल्या गावाला आणि गावातील लोकांना वाचवलंय.

असं काय केलं तिने

लिबरमॅन ही किबुत्ज समुदाय नीर एमची सुरक्षा समन्वयक आहे. गाजा पट्टीपासून काही किलोमीटर अंतरावर तिचं किबुत्ज हे गाव आहे. तिच्या गावात अतिरेकी येणार असल्याची खबर तिला मिळाली. त्यामुळे ती अलर्ट झाली. तिने गावातील 12 लोकांची सुरक्षा टीम तयार केली. त्यात महिलांचाही समावेश केला. सर्वांच्या हातात शस्त्र दिले आणि अतिरेक्यांवर कसं तुटून पडायचं हे सांगितलं. त्यानंतर हे सर्वजण गावाच्या वेशीवरच दबा धरून बसले.

काही वेळाने 25 अतिरेकी गावाच्या दिशेने आले. सर्वांच्या हातात शस्त्र होती. हे अतिरेकी वेशीवर येताच लिबरमॅन आणि तिच्या सहकाऱ्यांनी अतिरेक्यांवर गोळ्यांचा अंधाधूंद वर्षाव केला. काय होतंय हेही अतिरेक्यांना कळलं नाही. हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायच्या आतच सर्व अतिरेकी रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले. सर्वांचा खात्मा झाला होता. एकूण 25 अतिरेकी मारले गेले. लिबरमॅनच्या या धाडसाची माहिती जेव्हा पसरली, तेव्हा जगभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

कोण आहे लिबरमॅन

लिबरमॅन ही इस्रायलची एक धाडसी महिला आहे. अप्रतिम सौंदर्याचं वरदान तिला लाभलं आहे. ती बुद्धीमानही आहे. तसेच ती किबुत्जची पहिली महिला सैन्य सुरक्षा समन्वयक आहे. लिबरमॅन ही प्राणीप्रेमी आहे. हमासच्या हल्ल्यानंतर घरातील वीज गेली. शहरात रॉकेट हल्ला झाल्याने वीज गेली आहे. पुढील आदेश येईपर्यंत वीज येणार नसल्याचं प्रशासनाचं म्हणणं असल्याचं तिच्या वडिलांनी तिला सांगितलं होतं. त्यानंतर तिने लोकांना रस्त्यावर उतरून लढताना पाहिलं. तिच्या आजूबाजूचे लोकही लढत होते. त्यावेळीच तिने दहशतवाद्यांशी मुकाबला करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिने गावातील लोकांना एकत्र केलं आणि अतिरेक्यांना वेशीवरच रोखलं.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.