लेबनॉन : हेजबोलाच्या सदस्याच्या पेजर्समध्ये ब्लास्ट, इराणच्या राजदूतासह 1000 जण जखमी, इस्रायलवर संशय
लेबनॉनची राजधानी बैरुत येथे हेजबोला याच्या सदस्यांकडील पेजरमध्ये ब्लास्ट झाल्याने पाच जण ठार तर एक हजार जण जखमी झाले आहेत. या संदर्भात रॉयटर्सने इस्रायली डिफेन्स फोर्सला (IDF) या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रीया देण्यास नकार दिला आहे.
लेबनॉनमध्ये हेजबोलाच्या सदस्याच्या पेजर्स मध्ये सिरीयल ब्लास्ट झाल्याची घटना उघडकीस आली आहे. रॉयटर्सच्या बातमीनुसार मंगळवारी झालेल्या या साखळी स्फोटात पाच जण ठार झाल्याचे म्हटले जात आहे. इराणच्या राजदूतासह एक हजार जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यामागे इस्रायलचा हात असल्याचा आरोप होत आहे. रॉयटर्स वृ्त्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात या हल्ल्यात हेजबोला अतिरेकी संघटनेच्या सदस्यांसह काही डॉक्टरांचा देखील मृ्त्यू झाल्याचा संशय आहे. हिजबोला एकमेकांच्या संपर्कासाठी पेजरचा वापर करतात. या पेजरमध्येच ब्लास्ट झाल्याने पाच जण ठार तर एक हजार जण जखमी झाले आहेत.
लेबनॉनमध्ये झालेल्या या हल्ल्यानंतर अफरातफरी माजली आहे. लोकांच्या किंचाळ्यांनी संपूर्ण परिसर हादरला आहे. या ब्लास्टमध्ये पाच जण ठार झाल्याचे म्हटले जात आहे.अमेरिकेने बंदी घातलेल्या अतिरेकी संघटना हेजबोला याला टार्गेट करण्यासाठी लेबनॉनची राजधानी बैरुत मध्ये हे ब्लास्ट झाल्याचे म्हटले जात आहे. अमेरिका आणि युरोपीय संघाने हेजबोलावर बंदी घातलेली आहे.परंतू इराण या अतिरेकी संघटनेचे समर्थन करीत असून त्याला अर्थपुरवठा करीत आहे.
इस्रायलने केला वार ?
लेबनॉनमध्ये हेजबोला संघटनेचे अतिरेकी वापरीत असलेले पेजरमध्ये ब्लास्ट झाल्याने संपूर्ण इमारतीची पडझड झाली आहे. या संदर्भात हेजबोलाने इस्रायलवर आरोप केला आहे.हेजबोला संघटनेने या हल्ल्यास सुरक्षा यंत्रणेतील सर्वात मोठी चूक असे म्हटले आहे. हेजबोला यांनी म्हटले की त्यांच्या अतिरेक्यांकडे असलेले पेजर एकाच वेळी ब्लास्ट होऊन फुटले त्यामुळे अनेक जण गंभीर जखमी झाले असून पाच जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. लेबनॉनमध्ये अशा प्रकारची घटना प्रथमच घडली आहे. गाझापट्टीत इस्रायलने सैन्य घुसवल्यानंतर हेजबोलाने इस्रायली डिफेन्स फोर्सच्या विरोधात युद्ध छेडले आहे. इस्रायल आणि हेजबोला यांच्यातील युद्ध आता आणखीन भडकणार असल्याचे म्हटले जात आहे.