माझ्या वडिलांना फाशीपासून वाचव; 11 वर्षांच्या मुलाचे लुईस हॅमिल्टनला पत्र

2004 साली एका पोलीस कर्मचाऱ्याच्या हत्येप्रकरणी रामाधानच्या वडिलांना अटक करण्यात आली होती. | Lewis Hamilton

माझ्या वडिलांना फाशीपासून वाचव; 11 वर्षांच्या मुलाचे लुईस हॅमिल्टनला पत्र

बहरीन: फॉर्म्युला वन चॅम्पियन लुईस हॅमिल्टन (Lewis Hamilton) हा त्याच्या परखड सामाजिक भूमिकांमुळे अनेकदा चर्चेत असतो. मध्यंतरी अमेरिकेत वंशभेदाच्या मुद्द्यावरुन सुरु झालेल्या ब्लॅक लाईव्हज मॅटर (Black Lives Matter) या चळवळीचेही त्याने जाहीररित्या समर्थन केले होते. त्यानंतर आता लुईस हॅमिल्टन हा एका 11 वर्षांच्या मुलाने लिहलेल्या पत्रामुळे प्रचंड चर्चेत आला आहे. या मुलाने आपल्या वडिलांना फाशीच्या शिक्षेपासून वाचवण्यासाठी हॅमिल्टनकडे विनंती केली आहे. (11 year boy writes letter to Lewis Hamilton)

कोण आहे हा मुलगा?

बहरीनमध्ये राहणाऱ्या 11 वर्षांच्या रामाधान या मुलाने हे पत्र लिहले आहे. 2004 साली एका पोलीस कर्मचाऱ्याच्या हत्येप्रकरणी रामाधानच्या वडिलांना अटक करण्यात आली होती. मात्र, रामाधानच्या वडिलांवर दबाव टाकून त्यांना हे आरोप कबूल करायला लावले, असे मानवाधिकार संघटनांचे म्हणणे आहे. त्यानंतर रामाधानच्या वडिलांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

त्यामुळे रामाधानने आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी लुईस हॅमिल्टनला पत्र लिहले आहे. या पत्रासोबत रामाधानने स्वत:चा एक फोटो पाठवला आहे. या फोटोत रामाधान हॅमिल्टनच्या मर्सिडीज कारचे चित्र पकडून उभा आहे. त्यावर रामाधानने एक संदेश लिहला आहे. लुईस माझ्या वडिलांना वाचव. मी जेव्हा कारचे चित्र काढत होतो तेव्हा तुम्ही माझ्या वडिलांना वाचवू शकाल, हीच आशा माझ्या मनात होती, असे रामाधानने पत्रात म्हटले आहे.

लुईस हॅमिल्टन काय म्हणाला?

लुईस हॅमिल्टने अबुधाबी ग्रां पी स्पर्धेनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत यासंदर्भात भाष्य केले. त्याने म्हटले की, रामाधानचे पत्र वाचून मला धक्का बसला. एखाद्या निष्पाप व्यक्तीला फाशीची शिक्षा होणे ही दुर्दैवी गोष्ट आहे. याविषयी काहीतरी झाले पाहिजे. मी याकडे दुर्लक्ष करणार नाही. मी लवकरच त्या लोकांशी बोलून यावर काही मार्ग काढता येतो का हे बघेन, असे लुईस हॅमिल्टन याने सांगितले.

संबंधित बातम्या:

प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे ठरले, ‘या’ देशाचे पंतप्रधान राहणार उपस्थित

भारताचे लष्कर प्रमुख सौदी अरब-यूएईत, पाकिस्तानमध्ये खळबळ

कोरोना पुढील काळात आणखी धोकादायक, परिस्थिती बिघडू शकते, बिल गेटस यांचा इशारा

(11 year boy writes letter to Lewis Hamilton)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI