5

Pakistan Terrorist Attack : पाकमध्ये मोठा अतिरेकी हल्ला, हल्ल्यात 10 सैनिकांचा मृत्यू, एका अतिरेक्याचा खात्मा

पाकिस्तानी सेनेनं जारी केलेल्या माहितीनुसार ही घटना 25 आणि 26 जानेवारीच्या रात्री घडली आहे. यामध्ये एक अतिरेकी ठार झाला असून अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळतेय.

Pakistan Terrorist Attack : पाकमध्ये मोठा अतिरेकी हल्ला, हल्ल्यात 10 सैनिकांचा मृत्यू, एका अतिरेक्याचा खात्मा
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला
Follow us
| Updated on: Jan 28, 2022 | 6:29 AM

पाकिस्तानच्या (Pakistan) बलुचिस्तानमध्ये (Balochistan) मोठा अतिरेकी हल्ला करण्यात आला आहे. या अतिरेकी हल्ल्यामध्ये (Terrorist Attack)पाकिस्तानच्या 10 जवानांचा मृत्यू झाला असल्याचं वृत्त हाती येतंय. इंटक सर्विसेस पल्बिल रिलेशन्सचे महानिर्देशक मेज नजर बाब इफ्तिखार यांनी या हल्ल्याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी बलुचिस्तानच्या केच जिल्हायंत सुरक्षा रक्षकांच्या चौकीवर अतिरेक्यांनी अंधादुंध गोळीबार केला. या गोळीबारात 10 जवानांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानी सेनेनं जारी केलेल्या माहितीनुसार ही घटना 25 आणि 26 जानेवारीच्या रात्री घडली आहे. यामध्ये एक अतिरेकी ठार झाला असून अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळतेय. या हल्ल्यामुळे पाकिस्तानात एकच खळबळ उडाली आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून जागोजागी अलर्टही जारी करण्यात आल्याचं बोललं जातंय. या हल्ल्यानंतर आता अतिरेक्यांना पकडण्यासाठीचं आणि दहशतवादाला समूळ नष्ट करण्याचं मोठं आव्हान पाकिस्तानी सैन्यासमोर उभं ठाकलंय.

हल्ल्याचं कारण काय?

डॉन वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार सुरक्षादलाने केलेल्या कारवाईमध्ये एकून तीन अतिरेक्यांना पकडण्यात आलं आहे. दरम्यान, अजूनही या हल्ल्यातील अतिरेक्यांचा शोध घेण्याची मोहीम राबवली जात असल्याचंही सांगितलं जातंय. जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, सशस्त्र बल पाकिस्तानातून अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी कटीबद्ध असून त्यासाठी कोणतीही किंमत मोजायला पाकिस्तान तयार आहे, असं सांगण्यात आलं आहे. तालिबाननं अफगणिस्तानावर सत्ता काबिज केल्यानं त्याचे गंभीर पडसाद आता पाकिस्तानात जाणवू लागले असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

पाकमध्ये अतिरेकी हल्ले वाढले!

पाकिस्तान इंस्टीट्यूट फॉर कॉन्फ्लिक्ट ऍन्ड सिक्युरिटी (PICS) स्टडीनुसार 10 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीमध्ये पाकिस्ताननं अतिरेक्यांविरोधात प्रचंड संघर्ष केला. मात्र त्याचा परिणाम शून्य असल्याचं पिक्सनं केलेल्या अहवालातून दिसून आलं आहे. मोठ्या प्रयत्नांनंतरही पाकिस्तानाही अतिरेकी हल्ल्यांच्या घटना काही कमी होण्याचं नाव घेत नसल्याचं समोर आलं आहे.

पाकिस्तानात दरमहा अतिरेकी हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. या हल्ल्यांची जर सरासरी काढली, तर 2020 सालच्या तुलनेत 2021मध्ये अतिरेकी हल्ल्यांत वाढ झाली आहे. 2020 साली 16 अतिरेकी हल्ल्यांची नोंद पाकिस्तानात करण्यात आली होती. तर 2017 नंतर 2021मध्ये सर्वाधिक अतिरेकी हल्ले झाल्याचं नोंदवण्यात आलं आहे. 2021 या संपूर्ण वर्षात पाकिस्तानात तब्बल 25 वेळा अतिरेकी हल्ल्याच्या घटना घडल्यात.

संबंधित बातम्या :

महागाईच्या प्रश्नावर अमेरिका राष्ट्राध्यक्षांचा सुटला ताबा, पत्रकाराला शिवीगाळ, व्हाईट हाऊसमधील प्रसंग कॅमेऱ्यामध्ये कैद

अरुणाचलमधील अपहरण झालेला मीराम चीन सैनिकांच्या ताब्यात, पीएलएकडून भारतीय सैनिकांना माहिती

दिवाळं निघू नये म्हणून हा देश सोनं विकतोय, भारतानेसुद्धा असंच केलेलं!

Non Stop LIVE Update
AC Local वर दगडफेक, कांदिवली ते बोरिवली स्थानकादरम्यान नेमकं काय घडलं?
AC Local वर दगडफेक, कांदिवली ते बोरिवली स्थानकादरम्यान नेमकं काय घडलं?
भावी मुख्यमंत्री राज ठाकरे? फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले...
भावी मुख्यमंत्री राज ठाकरे? फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले...
इंडिया आघाडीची रॅली म्हणजे टोपी लावण्याचे काम? दीपक केसरकर म्हणाले...
इंडिया आघाडीची रॅली म्हणजे टोपी लावण्याचे काम? दीपक केसरकर म्हणाले...
'सैन्य कशाला हवं, ...तरी राऊत पळून जातील', कुणी उडवली राऊतांची खिल्ली?
'सैन्य कशाला हवं, ...तरी राऊत पळून जातील', कुणी उडवली राऊतांची खिल्ली?
'संजय राऊत आदित्य ठाकरेंना चावले की काय?', कुणी केला खोचक सवाल?
'संजय राऊत आदित्य ठाकरेंना चावले की काय?', कुणी केला खोचक सवाल?
भुजबळांचा जरांगे यांना सल्ला; 'मला एकट्याला टार्गेट करण्यापेक्षा...'
भुजबळांचा जरांगे यांना सल्ला; 'मला एकट्याला टार्गेट करण्यापेक्षा...'
'त्या' दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांचा उद्योगमंत्र्यांना खोचक सवाल
'त्या' दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांचा उद्योगमंत्र्यांना खोचक सवाल
'ढेकणांना मारण्यासाठी लष्कराची गरज नसते', राऊतांवर कुणाचा निशाणा?
'ढेकणांना मारण्यासाठी लष्कराची गरज नसते', राऊतांवर कुणाचा निशाणा?
आदित्य ठाकरे यांना भाजपचा खोचक सवाल, 'अफझलखान तुमचा पाहुणा लागतो का?'
आदित्य ठाकरे यांना भाजपचा खोचक सवाल, 'अफझलखान तुमचा पाहुणा लागतो का?'
शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरून राऊत यांचं आव्हान काय? थेट म्हणाले...
शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरून राऊत यांचं आव्हान काय? थेट म्हणाले...