AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवाळं निघू नये म्हणून हा देश सोनं विकतोय, भारतानेसुद्धा असंच केलेलं!

भारताचा शेजारी देश श्रीलंका (Sri Lanka Economic Crisis) स्वतःचे दिवाळे (Bankruptcy) निघण्यापासून स्वतःला वाचवत आहे आणि यासाठी चक्क या देशाने सोन्याची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे. सोने विक्री करून ही देश आपली अर्थव्यवस्था शाबूत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.

दिवाळं निघू नये म्हणून हा देश सोनं विकतोय, भारतानेसुद्धा असंच केलेलं!
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Jan 20, 2022 | 5:24 PM
Share

मुंबई : भारताचा शेजारी देश श्रीलंका (Sri Lanka Economic Crisis) स्वतःचे दिवाळे (Bankruptcy) निघण्यापासून स्वतःला वाचवत आहे आणि यासाठी चक्क या देशाने सोन्याची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे. सोने विक्री करून हा देश आपली अर्थव्यवस्था शाबूत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. श्रीलंकेच्या (Sri Lanka) च्या केंद्रीय बँकेनुसार (Central bank) श्रीलंकेने स्वतः ला भविष्यात होणाऱ्या नुकसानापासून रोखण्यासाठी परकीय चलन साठा वाचवण्यासाठी आपल्या सोन्याचा राखून ठेवलेला भाग (Gold Reserve) विकला आहे. श्रीलंकेचे प्रमुख अर्थशास्त्रज्ञ आणि सेंट्रल बँकेचे पूर्व डिप्टी गवर्नर डॉ. डब्ल्यू. ए विजेवर्धने (chief economist and former deputy governor of the central bank, Dr. W. A. Vijewardene) यांनी सांगितले की, केंद्रीय बँकेचे राखून ठेवलेले सोने कमी झाले आहे.

विजेवर्धने यांनी आपल्या ट्वीट मध्ये असे लीहले होते की, सेंट्रल बँकेचे राखून ठेवलेले सोने 38.2 कोटी डॉलर वरून कमी होऊन 17.5 कोटी डॉलर एवढे राहिले आहे तसेच श्रीलंका चे केंद्रीय बँकेचे गवर्नर निवार्ड कैब्राल (Governor Nivard Cabral) यांनी सुद्धा यावर आपले मत मांडले आणि सांगितले की देशाने आपल्या सोन्याचे जे भांडार होते त्यामधील एक हिस्साला लिक्विड फॉरेन एसेट्स वाढवण्यासाठी विकले आहे.

तज्ञांच्या माहितीनुसार, श्रीलंका (Sri Lanka) च्या केंद्रीय बँक ने चीन सोबत करेंसी स्वॅप नंतर वर्षाच्या अंती आपल्याकडील सोन्याचे तारण वाढवले आहे. रिपोर्ट नुसार अंदाज लावला जात आहे की, श्रीलंका च्या केंद्रीय बँक जवळ 2021 च्या सुरुवातीला 6.69 टन सोन्याचे भांडार होते त्यानंतर आता अंदाजे 3.6 टन सोने विकले गेले आहे. यामुळे या देशाकडे सध्या 3.0 ते 3.1 टन सोने शिल्लक राहिले आहे.श्रीलंकाच्या केंद्रीय बँकेने 2020 मध्ये सुद्धा सोने विकले होते.श्रीलंका जवळ आधी 19.6 टन सोन्याचे भांडार होते ज्यातील आता 12.3 टन सोने विकले गेले आहे. याआधी वर्ष 2015, 2018 आणि 2019 मध्ये सुद्धा श्रीलंका ने सोने विकले होते.

भारतात आली होती अशीच परिस्थिती

आपणास सांगू इच्छितो की भारताने सुद्धा 1991 मध्ये उदारीकरण मुळे आधीच देशाचे खराब झालेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी दोन वेळा सोने गहाण ठेवले होते. ही वेळ यशवंत सिन्हा अर्थमंत्री होते आणि चंद्रशेखर पंतप्रधान होते त्यावेळी आहे त्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय संस्थांनी भारताच्या दराने नीच्चांक गाठला होता, या कारणामुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दिवाळे निघण्याचा धोका वाढला होता अशा मध्येच सोने गहाण ठेवण्याचा निर्णय घेतला गेला यामुळे 20 हजार किलो सोन्याला मे 1991 मध्ये स्विझर्लंड च्या यु बी एस बँक मध्ये गुपचूप गहाण ठेवले गेले, त्याच्या बदल्यात भारताला 20 कोटी डॉलर मिळाले होते.

इतर बातम्या

Virat Kohli: चिडलेले गांगुली विराटला कारणे दाखवा नोटीस पाठवणार होते, नवीन धक्कादायक खुलासा

उत्तरप्रदेशच्या राजकारणात कंगनाची एन्ट्री, एक फोटो शेअर आणि सोशल मीडियावर चर्चाच चर्चा!

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...