Pakistan: तालिबान्यांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, 15 जवानांचा मृत्यू, 63 जणांचं अपहरण

पाकिस्तानच्या (Pakistan) खैबर पख्तूनख्वा प्रांतात (Khyber Pakhtunkhwa) कुर्रममध्ये (Kurram) तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (Tehrik i Taliban Pakistan) पाकिस्तानी सैन्यावर (Pakistani Army) हल्ला केलाय.

Pakistan: तालिबान्यांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, 15 जवानांचा मृत्यू, 63 जणांचं अपहरण
पाकिस्तानी सैनिक तुकडीवर हल्ला, प्रातिनिधिक फोटो


इस्लामाबाद : पाकिस्तानच्या (Pakistan) खैबर पख्तूनख्वा प्रांतात (Khyber Pakhtunkhwa) कुर्रममध्ये (Kurram) तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (Tehrik i Taliban Pakistan) पाकिस्तानी सैन्यावर (Pakistani Army) हल्ला केलाय. या हल्ल्यात पाकिस्तान सैन्याच्या कॅप्टनसह 12 ते 15 जवानांचा मृत्यू झालाय. याशिवाय अनेक सैनिक गंभीर जखमी झालेत. इतकंच नाही तर पाकिस्तान तालिबानच्या (Pakistan Taliban) दहशतवाद्यांनी सैन्याच्या 63 जवानांचं अपहरणही केलंय.

बंदी घातलेली दहशतवादी संघटना तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान विरोधात (पाकिस्तान तालिबान) सोमवारी एक मोहिम सुरू असताना पाकिस्तानी सैन्याला मोठं नुकसना झालंय. या दरम्यान अनेक सैनिक मारले गेलेत. यात 28 बलूच रेजिमेंटचे कॅप्टन अब्दुल बासित यांचाही समावेश आहे. बासित पाक फ्रंटियर कॉर्प्स विंगच्या थाल स्काउट्समध्ये प्रतिनियुक्तीवर होते.

तालिबानकडून पाकिस्तानला इशारा

मागील काही दिवसांपूर्वीच तालिबानने पाकिस्तानला (Pakistan) एक गंभीर इशारा दिला होता. तालिबानचा प्रवक्ता (Taliban’s Spokesperson) सुहैल शाहीन (Suhail Shaheen) म्हणाला होता, “तालिबान आणि अफगानिस्तानमध्ये चर्चेतून सामंज्यस करार करण्यासाठी मदत करण्यासाठी पाकिस्तानचं स्वागत आहे. मात्र,पाकिस्तान आम्हाला निर्देश देऊ शकत नाही किंवा त्यांचे विचार आमच्यावर थोपवू शकत नाही.”

हेही वाचा :

पाकिस्तानी अभिनेत्रीचा घरात नग्न मृतदेह आढळला, हत्या करुन गुन्हेगार बाथरूमच्या खिडकीतून फरार

Video | बलुचिस्तानमध्ये ‘तेरी मिट्टी’ गाण्याचा बोलबाला, अली बुगाटी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

लाहोर हादरलं, मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदच्या घराबाहेर स्फोट, 12 जखमी

व्हिडीओ पाहा :

Tehrik i Taliban Pakistan attack on Pakistan Army many soldiers dead

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI