इस्लामाबाद : पाकिस्तानची मॉडेल आणि अभिनेत्री नायब नदीम (Nayab Nadeem) रविवारी (11 जुलै) लाहोरमधील (Lahore) डिफेन्स एरियात आपल्या घरात मृतावस्थेत सापडली. एक्सप्रेस ट्रिब्यूनके दिलेल्या वृत्तानुसार, 29 वर्षीय नदीमची डीएचए फेज-5 मधील तिच्या घरात अज्ञात व्यक्तींनी गळा आवळून हत्या (Murder) केली. नदीमच्या शरीरावर आणि मानेवर काही निशाण सापडले आहेत. त्यामुळे हत्येपूर्वी पीडितेवर बलात्कार झाल्याचीही शक्यता वर्तवण्यात येतेय.