डोनाल्ड ट्रम्प यांना या देशाने दिला झटका, थेट करार रद्द करत केली जोरदार टीका
डोनाल्ड ट्रम्प हे टॅरिफच्या मुद्द्यावरून वादात अडकलेले असतानाच त्यांना जोरदार धक्का बसला आहे. थेट एका देशाने त्यांच्यासोबतच्या कोट्यवधी रूपयांचा करार रद्द केला आहे. फक्त करार रद्दच केला नाही तर जोरदार टीका पण केलीये.

टॅरिफच्या मुद्द्यावरून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मागील काही दिवसांपासून सतत टीका होत आहे. आता एका मुस्लिम देशाने डोनाल्ड ट्रम्प यांना जोरदार झटका दिला आहे. याचा परिणाम थेट अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर पडू शकतो. डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या अर्थव्यवस्थेला हत्यार बनवताना दिसत आहेत. मलेशियाकडून हा धक्का डोनाल्ड ट्रम्प यांना देण्यात आला आहे. त्यांनी अमेरिकेसोबतचा अत्यंत मोठा करार रद्द केला आहे. हा करार रद्द झाल्याने अमेरिकेचे कोट्यावधींचे नुकसान होणार आहे. मात्र, याबद्दल अजून डोनाल्ड ट्रम्प यांनी काहीच भाष्य केले नाहीये.
मलेशियाचे राजा सुलतान इब्राहिम यांनी अमेरिकेचे प्रसिद्ध ब्लॅक हॉक फायटर हेलिकॉप्टर्सची खरेदी रद्द केली. हा अत्यंत मोठा धक्का अमेरिकेसाठी असणार आहे. यासोबतच त्यांनी ब्लॅक हॉकला थेट उडता ताबूत म्हटले. मलेशियाचे सशस्त्र दलांचे प्रमुख जनरल मोहम्मद निजाम जाफर यांनी म्हटले की, ऑगस्टमध्ये राजा इब्राहिम यांनी ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरबद्दल एक मोठे विधान केले होते, ज्यानंतर या हेलिकॉप्टरच्या खरेदीबद्दल काही प्रश्न निर्माण झाली. त्यांना नाराजी व्यक्त केली.
आम्ही राजाने जी चिंता व्यक्त केली त्याला गांर्भियाने घेतले. 2023 मध्ये केलेला करार आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण अगोदर केलेल्या चुका परत करू नये, असे त्यांनी म्हटले असल्याने आम्ही करार रद्द केला आहे. हा करार रद्द झाल्याने अमेरिकेसाठी मोठा झटका आहे. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प हे टॅरिफच्या माध्यमातून इतर देशांकडून मोठा पैसा कमावण्याच्या तयारीत असतानाच हा करार रद्द झाला आहे. अमेरिकेकडून भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावण्यात आला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणले गेले आहेत. हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प मुद्द्यावरून ते भारताला धमकावताना देखील अनेकदा दिसले आहेत. सध्या भारत आणि अमेरिकेत व्यापार चर्चा बंद आहे. मात्र, याचा फायदा हा चीनकडून घेतला जात आहे. चीनने भारतावरील काही निर्बंध उठवली आहे.
