AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बापरे ! विमान टेक-ऑफ करताच नाका-तोंडातून रक्ताच्या धारा, क्षणभरातच तो… नेमकं झालं काय ?

बँकॉकहून जर्मनीला जाणाऱ्या विमानातील एका प्रवाशाची तब्येत अचानक बिघडली. त्याच्या नाका-तोंडातून अचानक रक्त निघाले. अन्य प्रवासी आणि क्रू मेंबर्सनी त्याला मदत करत प्रथमोपचार दिले. त्यानतर विमान अर्ध्या रस्त्यातूनच परत बँकॉककडे वळवण्यात आले. पण..

बापरे ! विमान टेक-ऑफ करताच नाका-तोंडातून रक्ताच्या धारा,  क्षणभरातच तो... नेमकं झालं काय ?
| Updated on: Feb 10, 2024 | 11:50 AM
Share

बँकॉक | 10 फेब्रुवारी 2024 : विमान प्रवासात विविध घटना घडत असतात. कधी प्रवासी काही गोंधळ घालतात. पण थायलंडच्या बँकॉक येथून एक अतिशय दुर्दैवी बातमी समोर आली आहे. बँकॉकहून जर्मनीला जाणाऱ्या विमानातील एका प्रवाशाची तब्येत अचानक बिघडली. लुफ्थांसा एअरलाइन्समध्ये बसलेला एक प्रवासी अचानक जोरजोरात खोकू लागला. बाजूलाच असलेली वॉमिट बॅग उचलली आणि त्याला उलटीही झाली. त्याची ही अवस्था पाहून फ्लाईटमधील स्टाफ त्याच्या मदतीसाठी धावला, कॅप्टनलाही तातडीने कळवण्यात आले. इमर्जन्सी सिच्युएशन पाहता, प्रवाशाचे प्राण वाचवण्यासाठी फ्लाइट तातडीने थायलंडच्या दिशेने वळवण्यात आली. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. फ्लाइटमध्येच त्या प्रवाशाचा दुर्दैवाने मृत्यू झाला.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, प्रत्यक्षदर्शींनी हा अनुभव कथ केला. तो अतिशय भयावह , भीषण अपघात होता. त्या इसाच्या नाका-तोंडातून अक्षरश: लिटरच्या प्रमाणात रक्त वहात होते. सुरूवातील त्याला श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. त्यामुळे तो जोरजोरात श्वास घेण्याचा प्रयत्न करत होता. पण अचानक त्याला उलटी झाली आणि त्याचा मृत्यू झाला. संपूर्ण फ्लाइटमध्ये त्या इसमाच्या सीटजवळ रक्तच रक्त दिसत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, जर्मनीतील राहणारा 63 वर्षांचा तो इसम पत्नीसह गुरूवारी रात्री बँकॉकहून फ्लाइटमध्ये चढला. त्या जोडप्याला म्युनिकला जायचे होते. पण फ्लाइटमध्ये चढताच त्या व्यक्तीला अचानक जोरात खोकला येऊ लागला. त्याचा चेहरा पूर्ण घामाने भिजला होता. फ्लाइटमधील प्रवासी त्याच्या मदतीसाठी जवळ आले. त्यांनी त्याला कॅमोमाइल चहा दिला आणि त्याची नाडी तपासली.

नाका-तोंडातून रक्ताच्या धारा

पण विमानाने उड्डाण करताच त्या इसमाची प्रकृती झपाट्याने खालावली. तेव्हा त्याच्या तोंडातून आणि नाकातून रक्ताच्या धारा निघाल्या. त्या माणसाने उलटी पिशवी घेतली आणि त्यात उलट्या होऊ लागल्या. काही सेकंदात ती पिशवी भरली पण त्या व्यक्तीच्या तोंडातून आणि नाकातून सतत रक्त येत होते. एअरबस A380 विमानाच्या भिंतींवरही सर्व रक्त सांडू लागले. तोपर्यंत क्रू मेंबर्सही त्या व्यक्तीच्या मदतीसाठी तेथे पोहोचले. त्या व्यक्तीला प्रथमोपचाराची सुविधा देण्यात आली. त्याची तब्येत खालावल्याने त्याला बडतोब दवाखान्यात नेणे अत्यंत गरजेचे असल्याचे कॅप्टनला सांगण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीमुळे फ्लाइट बँकॉकच्या दिशेने वळवण्यात येत असल्याची घोषणा कॅप्टनने केली. पण ते पोचेपर्यंत खूप उशीर झाला होता. अर्ध्या तासानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.

ते विमान बँकॉकला उतरताच सर्व प्रवासी उतरले. त्यानंतर त्यांना इतर विमानांद्वारे आपापल्या इच्छित स्थळी पाठवण्यात आले. कारण या घटनेनंतर हे विमान कॅन्सल करण्यात आले. हा विमान कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा असल्याचे काही प्रवाशांनी सांगितले. जेव्हा त्या व्यक्तीला फ्लाइटमध्ये चढल्याबरोबर खोकला येऊ लागला तेव्हाच त्यांनी त्याला वैद्यकीय सुविधा पुरवायला हवी होती. यामुळे त्याचा जीव वाचला असता. मात्र फ्लाइट अटेंडंट्सनी त्याकडे दुर्लक्ष करून उड्डाण केले, असा आरोप काही प्रवाशांनी केला.

प्रवाशांना दिली नुकसानभरपाई

या घटनेमुळे झालेल्या गैरसोयीची भरपाई करण्यासाठी त्यांना केवळ 860 रुपयांचे व्हाउचर्स देण्यात आले असून त्यांना दोन तास कोणीही विचारले नाही, असा आरोपही प्रवाशांनी केला. ते फक्त विमानतळावर बसले. मात्र, नंतर त्यांना अन्य विमानांद्वारे त्यांच्या इच्छित स्थळी पाठवण्यात आले.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.