AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीलंकेत मोठा गोंधळ, राष्ट्रपती भवनावर नागरिकांचा कब्जा, देश सोडून पळाले राष्ट्रपती राजपक्षे, 100 हून अधिक जखमी

श्रीलंकेतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी रानिल विक्रमसिंघे यांनी स्थितीवर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांची आपतकालीन बैठक बोलावली आहे. लोकसभा अध्यक्षांनी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणीही करण्यात आली आहे. तर दुसरीकडे रस्त्यांवर होणाऱ्या संघर्षात 100 हून जास्त जण जखमी झाल्याची माहिती आहे.

श्रीलंकेत मोठा गोंधळ, राष्ट्रपती भवनावर नागरिकांचा कब्जा, देश सोडून पळाले राष्ट्रपती राजपक्षे, 100 हून अधिक जखमी
20 जुलैला नवा राष्ट्रपतीImage Credit source: social media
| Edited By: Sandip Sakhare | Updated on: Jul 09, 2022 | 5:33 PM
Share

कोलंबो- श्रीलंकेत (Sri lanka) सरकारच्या विरोधातील उद्रेक रस्त्यांवर पाहायला मिळतो आहे. संतापलल्या लोकांनी (anggry citizens)राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानावर हल्ला करत, राष्ट्रपती भवन ताब्यात घेतले आहे. घरात आतपर्यंत नागरिक पोहचल्यानंतर, राष्ट्रपती तिथून निघाले असल्याची माहिती आहे. राष्टपती राजपक्षे (president Rajapaksa) हे देश सोडून पळून गेल्याचीही माहिती आहे. देशात कधीही आणीबाणी म्हणजेच मार्शल लॉ लागू करण्यात येऊ शकतो, असे सांगण्यात येते आहे. तर दुसरीकडे श्रीलंकेतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी रानिल विक्रमसिंघे यांनी स्थितीवर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांची आपतकालीन बैठक बोलावली आहे. लोकसभा अध्यक्षांनी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणीही करण्यात आली आहे. तर दुसरीकडे रस्त्यांवर होणाऱ्या संघर्षात 100 हून जास्त जण जखमी झाल्याची माहिती आहे.

दबावानंतर पोलिसांनी कर्फ्यू हटवला

श्रीलंकेतील सर्वोच्च वकिलांची सघटना, मानवाधिकार संस्था आणि राजकीय पक्षांच्या दबावानंतर पोलिसांनी शनिवारी कर्फ्यू हटवल्याची माहिती आहे. त्यानंतर देशात जोरदार विरोधी आंदोलने झाली. कोलंबो सहीत देशातील पश्चिमेच्या भागात सात ठिकाणी हा कर्फ्यू लावण्यात आला होता. यात नेगोंबो, केलानिया, मुगेगोडा, माऊंट लिविनिया, उत्तरी कोलंबो, दक्षिण कोलंबो आणि मध्य कोलंबोचा समावेश होता. शुक्रवारी रात्रीपासून पुढझील सूचनेपर्यंत हा कर्फ्यू लागू करण्यात आला होता. पोलीस महानिरीक्षकांनी या काळात नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये असे आवाहनही केले होते.

वकिलांच्या संघटनांनी कर्फ्यूला विरोध केला

या कर्फ्यूचा वकिलांच्या बार संघटनेने विरोध केला. हा क्र्फ्यू बेकायदेशीर आणि माधवी अधिकारांचे उल्लंघन असल्याचा दावा करण्यात आला होता. सरकार आणि राष्ट्रपती राजपक्षे यांना विरोध करण्याचा मूलभूत अधिकार देशातील नागरिकांना असल्याचा दावा या वकिलांनी केला होता. माधवाधिकार आयोगानेही हा कर्फ्यू कायद्याचे उल्लंघन असल्याचे सांगितले होते.

आर्थिक संकटाने श्रीलंकन नागरिक संतप्त

देशातील आर्थिक संकटाने नागरिक हैराम झाले आहेत. गेल्या काही काळापासून देशात गोटा गो गामा असे आंदोलन राष्ट्रपती राजपक्षे यांच्याविरोधात सुरु होते. या आंदोलकांना माजी क्रिेटर सनथ जयसूर्या याचाही पाठिंबा आहे.

Follow Us
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?
मोठी बातमी! ओमराजेंबाबात मी... ठाकरे असं म्हणाले? धाराशिवमधील
मोठी बातमी! ओमराजेंबाबात मी... ठाकरेंच्या विधानाने सगळेच अवाक्; धाराशिवमधील नगरसेवकांच्या बैठकीत असं काय घडलं?
दिल्लीत सीएनजी पंपावर भीषण स्फोट, रिफिलिंग दरम्यान मोठी दुर्घटना
दिल्लीत सीएनजी पंपावर भीषण स्फोट, रिफिलिंग दरम्यान मोठी दुर्घटना
अभिजीत दीपकेंची सर्वात मोठी मागणी! थेट म्हणाले, PM कॅअर फंडमधील 8,452
अभिजीत दीपकेंची सर्वात मोठी मागणी! थेट म्हणाले, PM कॅअर फंडमधील 8,452 कोटी रुपये... नेमकं काय घडलं?
अभिजीत दीपके नंतर आता रामदास आठवलेंचं या नेत्याला मोठं आवाहन;
अभिजीत दीपके नंतर आता रामदास आठवलेंचं या नेत्याला मोठं आवाहन; रिपब्लिकन पक्षात विलीन होण्याची मागणी
आवडत्या शिक्षकाच्या बदलीने चिमुकल्यांचे डोळे पाणावले; पालकांसह ठिय्या,
आवडत्या शिक्षकाच्या बदलीने चिमुकल्यांचे डोळे पाणावले; पालकांसह ठिय्या, शाळेत न जाण्याचा इशारा
ओमराजेंच्या जवळच्या नेत्याचं सुचक विधान; शिवसेना पक्ष सुनावणीबाबत...
ओमराजेंच्या जवळच्या नेत्याचं सुचक विधान; शिवसेना पक्ष सुनावणीबाबत म्हणाले, बहुसंख्य लोकांची ओढ...