AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दूध २७० रुपये लीटर, चिकन ८०० रुपये किलो; पाकिस्तानात महागाईचा कहर

ग्राहकांना दूध, चिकन यासारख्या वस्तू खरेदी करणे शक्य होत नाही. दुधाच्या किमती १९० रुपये प्रतिलीटरवरून २१० रुपयांपर्यंत गेल्या आहेत. गेल्या दोन दिवसांत बायलर चिकनचे दरही गगनाला भिडले आहेत.

दूध २७० रुपये लीटर, चिकन ८०० रुपये किलो; पाकिस्तानात महागाईचा कहर
| Updated on: Feb 14, 2023 | 10:45 AM
Share

नवी दिल्ली : पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. महागाई प्रचंड वाढली आहे. सामान्य व्यक्तीला दूध, चहा, यासारख्या मूलभूत वस्तू खरेदी करणे कठीण झाले आहे. किचनमधून पोळ्या बनवण्यासाठी लागणारी कणीक गायब झाली आहे. बिस्किटांसाठी मारामारी आहे. दूध, चिकन खरेदी करणे परवडेनासे झाले आहे. बंदरावर सामान पोहचला आहे. पण, ते खरेदी करणे पाकिस्तानला शक्य नाही. दुधाची किंमत २१० रुपये प्रतिलीटर झाली आहे. काही ठिकाणी अव्वाच्या सव्वा भाव आहे. चहापत्ती २ हजार ५०० रुपये किलो झाली आहे.

महागाईवर ताबा मिळवणे कठीण

पाकिस्तान आयएमएफकडून मदतीची याचना करत आहे. जेणेकरून महागाईवर ताबा मिळवता येईल. अर्थव्यवस्था ढासळल्याने पाकिस्तानला कर्ज मिळणे कठीण झाले आहे. ग्राहकांना दूध, चिकन यासारख्या वस्तू खरेदी करणे शक्य होत नाही. दुधाच्या किमती १९० रुपये प्रतिलीटरवरून २१० रुपयांपर्यंत गेल्या आहेत. गेल्या दोन दिवसांत बायलर चिकनचे दरही गगनाला भिडले आहेत. आता याची किंमत ४८० ते ५०० रुपये किलो झाली आहे.

७०० रुपये किलो चिकन

बोनलेस मांसाची किमत १ हजार ते १ हजार १०० रुपये प्रतिकिलो झाली आहे. मिल्क रिटेलर्स असोसिएशनने सांगितलं कीा, १ हजार पेक्षा जास्त दुकानदार दुधाची किंमत वाढवून विकत आहेत. दुधाच्या किमती २१० ते २२० रुपये प्रतिलीटर पर्यंत गेल्या आहेत. जीवंत कोंबड्या ६०० रुपये किलोग्रामने विकल्या जात आहेत. चिकनचे दर ६५० ते ७०० रुपयांपर्यंत पोहचले आहेत.

कांदे २२० रुपये किलो

पाकिस्तानात कांदे २२० रुपये किलो मिळत आहेत. पोळ्या तेयार करण्यासाठी लागणारी कणीक १५० रुपये किलोच्या भावाने विक्री केली जात आहे. पेट्रोल, डिझेलसह आवश्यक वस्तूंचीही टंचाई जाणवत आहे. दूध, तांदुळ लोकांपर्यत पोहचत नाही. कणकीसाठी लोकं एकमेकांसोबत वाद करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अशा वाढल्या किमती

बासमती तांदळाची किंमत १०० रुपयांवरून १४६ रुपये किलो झाली आहे. मोहरीचे तेल ३७४ रुपये लीटरवरून ५३२ रुपये किलो विकले जात आहे. पोळ्या मिळणे कठीण झाल्याने काही जण ब्रेडवर दिवस काढत आहेत. ब्रेडची किंमतही ६५ रुपयांवरून ८९ रुपये झाली आहे. एकंदरित प्रत्येक वस्तूच्या किमतीत दीडपट ते दोनपट वाढ झाल्याने सामान्य लोकं हैरान झाले आहेत.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.