AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“काय आम्हीपण मरणार आहोत?;” भूकंपातील जखमी मुलीचा सवाल

मुलांना वयस्क लोकांकडून भावनात्मक समर्थनाची खरी गरज आहे. परंतु, एक आई त्यांना म्हणाली, मी आपल्या मुलांची काळजी घेऊ शकत नाही.

काय आम्हीपण मरणार आहोत?; भूकंपातील जखमी मुलीचा सवाल
| Updated on: Feb 14, 2023 | 9:42 AM
Share

तुर्की : तुर्की आणि सीरियात विनाशकारी भूकंप आला. वाईट स्वप्नांपेक्षा भयावह अशी परिस्थिती तुर्कीत आहे. भूकंपामुळं लोकांच्या मनात अतिशय भीतीचे वातावरण पसरले आहे. भूकंपाविषयी आपण फक्त विचार करू शकतो. तुर्कीत गेल्या आठवड्यात भूकंप आला. घर कोसळल्यानंतर मुलीनं आपल्या वडिलांना सवाल केला. ती म्हणाले, आपण मरणार आहोत काय? तुर्कीच्या रस्त्यांच्या बाजूला अॅम्बुलन्सचे सायरन वाजत आहेत. इमारतींच्या मलब्याखाली सापडलेले मृतदेह काढण्याचे काम बचाव पथक करत आहे. भूकंपाच्या भीतीने तातोग्लू यांनी घरचे चार मुलं घराबाहेर काढले. भूकंपाच्या धक्क्यानंतर त्यांची इमारत कोसळली. त्या भागात ३५ हजार लोकं जमिनीत गाडले गेलेत. मृतकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

मुलं विचारताहेत प्रश्न

तातोग्लू यांनी या भूकंपात सुमारे १२ नातेवाईक गमावले. परंतु, भूकंपानंतर आपल्या जवळच्या लोकांसोबत उभं राहावं लागेल, हे त्यांना कळलं. तातोग्लू यांनी सर्वात आधी मुलांच्या मनातील भीती दूर केली. कारण भूकंपानंतर बऱ्याच लोकांच्या मनात भीती अजूनही कायम आहे. तातोग्लू म्हणाले, भूकंपानंतर याचा धक्का लहान मुलांवर जास्त बसला आहे. ते नेहमी विचारतात, आम्ही मरणार आहोत काय?

धीर देण्याचा प्रयत्न

मुलं वारंवार आपल्या नातेवाईकांबाबत विचारत आहेत. कारण काही जणांचे मृतदेहही पाहत आले नाहीत. तातोग्लू म्हणाले, मी आणि माझी पत्नी आम्ही मुलांना समजावून सांगत आहोत. त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत आहोत.

मुलांची काळजी घेऊ शकत नाही

डॉक्टर्स वर्ल्डवाईड तुर्की स्वयंसेवी संघटनेचे डॉक्टर्स सुअदा देवेसी म्हणतात, मुलांना वयस्क लोकांकडून भावनात्मक समर्थनाची खरी गरज आहे. परंतु, एक आई त्यांना म्हणाली, मी आपल्या मुलांची काळजी घेऊ शकत नाही. मी त्यांना जेवणही देऊ शकत नाही, अशी सध्या परिस्थिती आहे.

माझी आई कुठं आहे?

डॉक्टर सिहान सेलिक म्हणाले, ढिगाऱ्यातून मुलाला बाहेर काढण्यात आले. तेव्हा तो त्याच्या आईबद्दल विचारना करत होता. जखमी मुलानं विचारलं माझे आई-बाबा कुठं आहेत. तुम्ही माझं अपहरण करता का? तुर्की उपराष्ट्रपती फुअत ओकटे यांनी सांगितलं की, कित्तेक इमारतींमधून काढण्यात आलेले ५७४ मुलं त्यांचे आई-वडील गमावून बसले आहेत.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.