AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड लखवीला पाकिस्तानात 15 वर्षांची शिक्षा

मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड, लश्कर ए तोयबाचा ऑपरेशनंन्स कमांडर, दहशतवादी जकीउर रहमान लखवीला 15 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. (Mumbai attack mastermind Lakhvi sentenced to 15 years in jail )

मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड लखवीला पाकिस्तानात 15 वर्षांची शिक्षा
| Updated on: Jan 08, 2021 | 4:34 PM
Share

लाहोर: मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड, लश्कर-ए-तोयबाचा ऑपरेशनंन्स कमांडर, दहशतवादी जकीउर रहमान लखवीला 15 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. टेरर फंडिंग प्रकरणी पाकिस्तानमधील लाहोरच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. (Mumbai attack mastermind Lakhvi sentenced to 15 years in jail)

गेल्याच आठवड्यात टेरर फंडिंग प्रकरणी जकीउर रहमान लखवीला पाकिस्तानात अटक करण्यात आली होती. डिस्पेन्सरीच्या नावावर पैसा जमा करून त्याचा दहशतवादी कारवायांसाठी वापर केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने आज कोर्टाने त्याला 15 वर्षांची शिक्षा सुनावली.

आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित

मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 मध्ये हल्ले झाले होते. या हल्ल्यात 166 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 300 लोक जखमी झाले होते. जकीउर रहमना लखवी हा या हल्ल्याचा मास्टरमाइंड असून त्याचा मुंबई पोलीस शोध घेत होती. भारत सरकारने त्याला सप्टेंबर 2019मध्ये यूएपीए अंतर्गत दहशतवादी घोषित केलं होतं. तर UNSC मध्ये त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलं होतं. 26/11च्या हल्ल्याच्या तपासात लखवीनेच हाफिज सईदला मुंबई हल्ल्याचा कट रचून दिल्याचं उघड झालं होतं.

पूर्वीही अटक झाली होती

मुंबईवरील हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानात जकीउर रहमान लखवीला अटक करण्यात आली होती. मात्र पाकिस्तान सरकारने त्याला एप्रिल 2015मध्ये सोडलं होतं. लखवी विरोधात कोणतेही आरोप नसल्याचं कारण पुढे करत त्याला सोडून देण्यात आलं होतं. तुरुंगात असतानाही त्याच्या दहशतवादी कारवाया सुरूच होत्या. आता त्याला टेरर फंडिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. अतिरेक्यांना मदत आणि आर्थिक रसद पोहोचवल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. (Mumbai attack mastermind Lakhvi sentenced to 15 years in jail)

संबंधित बातम्या:

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड जकीउर रहमान लखवी जेरबंद; टेरर फंडिंग प्रकरण भोवणार?

मुंबईवरील 26 /11 दहशतवादी हल्ल्याची 12 वर्षे, पाकिस्तानची पोलखोल करणारे ‘सात मुद्दे’

मुंबई हल्ल्यामागचा सूत्रधार हाफिज सईदला 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

मुंबईवर मोठ्या दहशतवादी हल्ल्याचं सावट; ड्रोन उड्डाणांवर बंदी

(Mumbai attack mastermind Lakhvi sentenced to 15 years in jail )

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.