संसदेत बाळाला घेऊन आली खासदार, कडेवर तान्हुल्याला ठेवून ठोकले भाषण, सभागृह पहात राहिले video
ऑस्ट्रेलियाच्या संसदेत क्वींसलँडच्या लेबर पार्टीच्या नवनिर्वाचित सिनेटर कोरिन यांनी आपले पहिले भाषण दिले आहे. या दरम्यान त्यांच्याकडेवर त्यांचे लहान बाळ खेळत होते.

ऑस्ट्रेलियाच्या संसदेत एक खुप सुंदर क्षण अनुभवता आला. क्वीन्सलँडची लेबर पार्टी नवनिवार्चित सिनेटर कोरिन मुलहोलँड (Corinne Mulholland) यांनी आपले पहिले संसदेतले भाषण आपल्या लहान बाळाला ( ऑगी ) याला कडेवर घेऊन गेले आहे. हा क्षण केवळ भावनात्मक नव्हता तर एक सशक्त संदेश देखील दिला. त्या म्हणाल्या की खासदार केवळ लोकप्रतिनिधी नसतात तर एक पालकही असतात..
कोण आहेत कोरिन मुलहोलँड?
येथे मे 2025 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणूकांमध्ये कोरिन मुलहोलँड यांनी विजय मिळवला आहे. लेबर पार्टीच्या सिनेटर कोरिन मलुहोलँड यांनी पहिल्यांदा सिनेटमध्ये आपले भाषण दिले तेव्हा त्यांच्या कडेवर तिन महिन्याचा मुलगा ऑगी होता. त्या हसत म्हणाल्या की,’ मी आशा करतेय की मी आणि ऑगी बिना कोणत्याही अडचणीशिवाय हे भाषण पूर्ण करु शकेन,’या भाषणात कोरिन यानी आपले व्यक्तीगत अनुभवांद्वारा त्या सर्व नोकरी करणाऱ्या पालकांच्या भावनांना आवाज दिला ते रोज आपल्या कौटुंबिक जबाबदारी आणि प्रोफेशन लाईफ दरम्यान संतुलनाच्या खटपटीत लागलेले असतात.
येथे पाहा व्हिडीओ –
View this post on Instagram
कोरिन म्हणाल्या की ऑगी येथे कोणताही प्रतिक म्हणून नाही,परंतू मला हे लक्षात ठेवण्यासाठी आहे की अखेर मी येथे का आहे? मी क्वीन्सलँडच्या बाहेरील भागातून आलेले एक पत्नी आणि एक आई आहे. त्या ठामपणे म्हणाल्या की संसदेत आई-वडील केवळ विचार म्हणून नाही तर आपल्या संपूर्ण जीवन आणि आव्हानांसोबत असायला हवेत. त्या म्हणाल्या की त्या त्यांची मातृत्व शक्ती सिनेटमध्ये आणू इच्छीत आहेत. त्यांनी आपल्या भाषणात आपल्या जुन्या आठवणींना उजाला देत त्या म्हणाल्या निवडणूक प्रचारात माझा मुला केवळ तीन महिन्यांचा होता.
नोकरी पेशा आई-वडिलांसाठी हा मार्ग प्रशस्त केला
त्यांनी हे ही सांगितले की आता अखेर अनेक पिढ्यांनी नोकरी पेशा आई-वडिलांसाठी हा मार्ग प्रशस्त केला आहे. त्यामुळे आता वेळ आली आहे की संसदेच्या बाहेरच्या जगातही असा लवचिकपणा आणि पर्यायांची व्यवस्था केली पाहीजे. त्या म्हणाल्या की,’ मी नोकरी पेशा कुटुंबाच्या जीवनाला थोडे सोपे बनवू इच्छित आहे. मला वाटते की कुटुंबांना हा पर्याय आणि स्वतंत्रता मिळायला हवी की केव्हा आणि कुठे काम करावे.’ कोरिन यांच्या कुशीत ऑगी कोणत्याही अडचणीशिवाय बिनधास्त होता. तरीही भाषण संपवण्यापूर्वी ऑगीला कोणा अन्य सिनेटरकडे सोपवावे लागले.
