AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

News9 Global Summit: न्यूज 9 चे दूसरे ग्लोबल समीट उद्या दुबईत, भारत-UAE यांच्या भागीदारीवर चर्चासत्र

"भारत-यूएई: समृद्धी आणि प्रगतीसाठी भागीदारी" या शीर्षकासह न्यूज 9 ची दुसरी ग्लोबल समीट गुरुवारी दुबईमध्ये होत आहे. त्यात धोरणकर्ते, बिझनस लीडर्स, टेक तज्ज्ञ, बॉलिवूड सेलिब्रिटींसह अनेक प्रभावशाली व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. या समीटमध्ये भारत आणि यूएईमधील वाढत्या आर्थिक आणि सांस्कृतिक संबंधांवर लक्ष केंद्रित केले जाईल, ज्यामध्ये CEPA, IMEC सारख्या महत्त्वाच्या पैलूंवर चर्चा केली जाईल.

News9 Global Summit: न्यूज 9 चे दूसरे ग्लोबल समीट उद्या दुबईत, भारत-UAE यांच्या भागीदारीवर चर्चासत्र
| Updated on: Jun 18, 2025 | 9:58 PM
Share

‘भारत-यूएई: समृद्धी आणि प्रगतीसाठी भागीदारी’ या विषयावर गुरुवारी दुबईत News9 चे दूसरे ग्लोबल समीट रंगणार आहे. या समीटमध्ये धोरण निर्माता, बिझनस लीडर्स, टेक एक्सपर्ट्स, अनेक मोठ्या हस्तींसह बॉलीवुडचे तारे देखील सहभागी होत आहेत.  हे ग्लोबल समीट भारत-यूएई यांचे वाढते आर्थिक आणि सांस्कृतिक संबंधाबद्दल आहे. यात CEPA, IMEC सारख्या महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

TV9 नेटवर्कचे दूसरे आंतराष्ट्रीय समीट ( News9 Global Summit ) 19 जून, 2025 रोजी दुबईत आयोजित करण्यात आले आहे.या समीटमध्ये भारत-युएई भागीदारीच्या प्रमुख मुद्यांवर फोकस केले जाणार आहे. पहिले आंतरराष्ट्रीय समीट नोव्हेंबर 2024 रोजी जर्मनीत आयोजित केले होते. त्यानंतर हे दुसरे आंतरराष्ट्रीय समीट आहे. या व्यासपीठावर धोरण निर्माता, बिझनसमन लीडर्स, टेक एक्सपर्ट्स, प्रसिद्ध हस्ती आणि प्रभावशाली लोकांची मांदियाळी जमणार आहे.

हे संमेलन दोन्ही देशांच्या दरम्यानची प्रगती, इनोव्हेशन आणि सांस्कृतिक आणि आर्थिक संबंधांना मजबूत करण्यासाठी एक सामायिक दृष्टीकोन घेऊन काम करणार आहे. यंदाची थीम ‘भारत-यूएई: समृद्धी आणि प्रगतीसाठी भागीदारी’ अशी ठेवण्यात आली आहे.

दुबई ताजमध्ये आयोजन

या टीव्ही 9 ग्लोबल समीटचे आयोजन 19 जून, 2025 रोजी दुबईतील ताज हॉटेलमध्ये होणार आहे. यात अनेक मान्यवर, बिझनस लीडर्स, टेक एक्सपर्ट्स, बॉलीवुड हस्ती तसेच भारत आणि यूएईतील प्रभावशाली व्यक्ती सामील होणार आहेत.

केंद्रीय तेल आणि गॅस मंत्री हरदीप सिंह पुरी यांचे मुख्य भाषण होणार आहे. तर बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे पूज्य ब्रह्मविहारी स्वामी दोन्ही देशांदरम्यान अद्वितीय आध्यात्मिक संबंधांवर बोलणार आहेत.

यूएईमधील भारताते राजदूत संजय सुधीर देखील भारत-यूएई भागीदारीचे महत्व या विषयावर बोलणार आहेत. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये जर्मनीच्या स्टटगार्टमध्ये ग्लोबल समीटच्या यशस्वी आयोजनानंतर न्यूज 9 यूएईमध्ये ग्लोबल समीट आयोजित करीत आहे.  न्यूज 9 ग्लोबल समीट श्रृंखलेची संकल्पना प्रमुख देशांसोबत भारताच्या व्यापारी आणि राजकीय संबंधांना मजबूत करणे या उद्देश्याने रचली आहे.

भारत-UAE भागीदारीवर फोकस

टीव्ही 9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी म्हटले आहे की , ‘जर्मनीत आमच्या पहिल्या ग्लोबल समीटच्या यशानंतर आता आम्ही यूएईमध्ये न्यूज 9 ग्लोबल समीटचे आयोजन करण्याबाबत उत्साहित आहोत. यूएई इनोव्हेशन आणि व्यापाराने संपन्न देश आहे. हे व्यासपीठ सीमापार भागीदारी निर्माण करण्याच्या आमच्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंबित करते.ज्यामुळे शाश्वत प्रगतीला चालना मिळते. भारत आणि युएईमध्ये गतिमान संबंध आहेत आणि ही शिखर परिषद संवाद आणि सहकार्यासाठी एक महत्त्वाचे ठिकाण असेल.

ग्लोबल समीटच्या अजेंड्यात द्विपक्षीय संबंधांच्या प्रमुख स्तंभांवर अनेक हाय-प्रोफाइल पॅनेल चर्चांचा समावेश आहे, ज्यामध्ये व्यापक आर्थिक भागीदारी करार (CEPA), भारत-मध्य पूर्व-युरोप कॉरिडॉर (IMEC), शुल्क आव्हाने, स्टार्ट-अप्स, एआय आणि सांस्कृतिक सहभाग यांचा समावेश आहे.

हे सेलिब्रिटी सहभागी होणार

या जागतिक समीटला सेलिब्रिटी वक्त्ते लाभले असून त्यात बॉलीवूड स्टार सुनील शेट्टी, आघाडीची टीव्ही निर्माता एकता कपूर आणि प्रतिभावान अभिनेत्री नर्गिस फाखरी यांचा समावेश आहे.

अनेक आघाडीच्या संस्था या कार्यक्रमाला पाठिंबा देत आहेत. यामध्ये ब्यूमार्क (समिट पॅट्रॉन), डी बियर्स, टाटा एआयजी इन्शुरन्स आणि नॅशनल एजी कोऑर्डिनेशन कमिटी (असोसिएट प्रायोजक) यांचा समावेश आहे.

क्लासमेट, एनोक, जेके सुपर सिमेंट आणि वुमनप्रेन्युअर मासिक आदींनी ग्लोबल समीटला प्रायोजक म्हणून पाठिंबा देत आहेत. स्किल ट्रॅव्हल्स हे ट्रॅव्हल पार्टनर आहेत, तर SOIL आणि सीता वाटिका हे सेलिब्रेशन पार्टनर आहेत. मुंबईतील फेमस स्टूडियो इंटरनेटमेंट पार्टनर आहे आणि UAE मधील खलीज टाईम्स हे मीडिया पार्टनर आहेत. अबू धाबीस्थित इंडियन पीपल्स फोरम डायस्पोरा पार्टनर आहेत.

न्यूज 9 ग्लोबल समीट यूएई 2025 विचार नेतृत्व, राजकीय अंतर्दृष्टि आणि भारत-यूएई गुंतवणूक संदर्भातील परिस्थिती तंत्राची पुढची पीडी तयार करण्यासाठी एक अद्वितीय मंच प्रदान करते. लाईव्ह अपडेटसाठी @News9Tweets ला फॉलो करा आणि न्यूज 9 वर लाईव्ह समीट कव्हरेज पाहा आणि TV9 नेटवर्क चॅनल आणि वेबसाईटवर हाईलाइट्स पाहा

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.