Nobel Prize Money : नोबेल विजेत्याला मिळतो ‘खजिना’; पुरस्कारच्या रक्कमेत तर खरेदी करता येतील 10 आलिशान बंगले
Nobel Peace Prize Money 2025 : व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांना यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला. नोबेल विजेत्याला बक्षिस म्हणून किती रक्कम मिळते हे तुम्हाला माहिती आहे का? या रक्कमेत त्यांना 10 आलिशान बंगले खरेदी करता येतील इतकी मोठी रक्कम असते.

Venezuela Maria Corina Machado Win Nobel Peace Prize : तर व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांना यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या पुरस्कारासाठी जंगजंग पछाडले. पण अखेर त्यांनी जगात स्वतःचं हसंच नाही तर नाचक्की करून घेतली. त्यांच्या दबावाला बळी न पडता नोबेल पुरस्कार निवड समितीने मचाडो यांना शांतता पुरस्कार जाहीर केला. नोबेल विजेत्याला बक्षिस म्हणून किती रक्कम मिळते हे तुम्हाला माहिती आहे का? या रक्कमेत त्यांना 10 आलिशान बंगले खरेदी करता येतील इतकी मोठी रक्कम असते.
6 ऑक्टोबर 2025 रोजी शास्त्रज्ञ मेरी ब्रुंको, फ्रेड रॅम्सडेल आणि शिमोन साकागुची यांना शरीरक्रियाविज्ञान,वैद्यकशास्त्रातील पुरस्कार जाहीर झाला. तर भौतिक शास्त्रातील नोबेल जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना देण्यात आला. नोबेल सहा श्रेणीमध्ये देण्यात येते. इतर श्रेणीतील पुरस्कारांची घोषणा अगोदरच झाली आहे. आज सर्वाधिक चर्चेत असलेल्या नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा करण्यात आली. डोनाल्ड ट्रम्प यांची जगभर नाचक्की झाली. तर 13 ऑक्टोबर रोजी अर्थविज्ञानमधील पुरस्काराची घोषणा होईल.
नोबेल पुरस्काराची रक्कम किती?
सध्या प्रत्येक नोबेल पुरस्कार विजेत्याला 11 दशलक्ष स्वीडिश क्रोनर (SEK) इतकी रक्कम देण्यात येते. ही रक्कम जवळपास 1.2 दशलक्ष अमेरिकन डॉलरच्या समान आहे. भारतीय चलनात ही रक्कम 10,63,34,944.80 रुपये इतकी होते. 10 कोटींपेक्षा ही रक्कम अधिक आहे. या रक्कमेत तर 10 आलिशान बंगले खरेदी करता येतात. इतकी मोठी रक्कम आहे. याशिवाय विजेत्याला खास 18 कॅरेट सोन्याचे पदक, प्रमाणपत्र देण्यात येते. एक नोबेल पुरस्कार हा जास्तीतजास्त 3 विजेत्यांना विभागून दिल्या जाऊ शकतो.
अशी होते निवड
नोबेल शांतता पुरस्कार निवड समिती ओस्लो आणि स्टॉकहोम येथे या पुरस्काराची घोषणा करते. नॉर्वेच्या संसदेने नियुक्त केलेले पाच सदस्य असतात. ते या पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड करतात. त्यापूर्वी जागतिक घटना, ट्रेंड आणि शांतता प्रयत्नांचा अभ्यास करतात. या पुरस्कारासाटी सरकार, राष्ट्रप्रमुख, प्राध्यापक आणि माजी विजेत्यांसह अनेक स्त्रोतांकडून नामांकने येतात. नोबेल शांतता पुरस्कार वगळता इतर श्रेणीत नामांकन पाठवता येते. या पुरस्कारासाठी पात्र व्यक्तीला सर्व अटी आणि शर्तींचे पालन करावे लागते. तो त्या चौकटीत बसला तरच त्याला पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार त्याच व्यक्तीला देण्यात येतो. ज्याच्यामुळे मानव जातीत अमुलाग्र बदल होतो, कल्याण होते.
