हुकूमशहा किम जोंगची अमेरिकेला थेट धमकी? अणुबॉम्ब… डोनाल्ड ट्रम्प यांना फुटला घाम!
Kim Jong Un : उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी अलीकडेच एक मोठे विधान केले आहे. यामुळे जागतिक राजकारणात वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली आहे. .याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. या युद्धामुळे जगातील इतरही देश आपल्या सुरक्षेची काळजी घेताना दिसत आहेत. अशातच आता उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी अलीकडेच एक मोठे विधान केले आहे. यामुळे जागतिक राजकारणात वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली आहे. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर किम जोंग-उन यांनी म्हटले की, ‘इराणवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्याकडे पाहून असा प्रश्न निर्माण होतो की उत्तर कोरियाकडे अण्वस्त्रे का नसावीत?’
किम जोंग उन यांच्या या विधानातून असे सूचित होते की, जर एखाद्या देशाकडे मजबूत संरक्षण (अण्वस्त्रे) नसेल, तर तो देश असुरक्षित आहे, त्या देशावर बाहेरून हल्ले होऊ शकतात. या विधानाचा अर्थ असाही लावला जात आहे की उत्तर कोरिया आपल्या अणु कार्यक्रमाचे समर्थन करण्याचा प्रयत्न करत आहे. तो दाखवू इच्छितो की अण्वस्त्र शक्ती हीच सुरक्षेची हमी आहे. ही अमेरिकेसाठी धोक्याची घंटा आहे.
उत्तर कोरियाची सध्याची स्थिती
उत्तर कोरिया हा आधीपासूनच अण्वस्त्रे असलेला देश मानला जातो आणि या मुद्द्यावर त्याचा अनेकदा अमेरिकेसोबत संघर्ष झाला आहे. अशातच आता आखाती देशांमध्ये संघर्ष सुरु आहे, त्याचवेळी किम यांचे हे विधान आले आहे. यामुळे जगभरात शस्त्रास्त्रांची स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे. आता लहान देशही स्वतःच्या सुरक्षेसाठी अणु शक्तीकडे वळू शकतात, यामुळे जगात अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे.
उत्तर कोरियाची क्षेपणास्त्रे आणि अणुशक्ती
उत्तर कोरिया हा जगातील अशा देशांपैकी एक आहे, ज्याची ताकद शस्त्रास्त्रांवर अवलंबून आहे. या देशाकडे मोठ्या प्रमाणात अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रे आणि मोठी लष्करी ताकद आहे. अंदाजानुसार उत्तर कोरियाकडे सुमारे 20 ते 60 अण्वस्त्रे असू शकतात. या देशाने अनेक वेळा अणुचाचण्या केल्या आहेत आणि तो सतत आपली शस्त्रसामग्री अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे जगातील अनेक बडे देश या देशाला गंभीरतेने घेतात.
समोर आलेल्या माहितीनुसार, क्षेपणास्त्रांच्या बाबतीत उत्तर कोरिया खूप प्रगत आहे. या देशाकडे लघु, मध्यम आणि दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे आहेत. या देशाच्या लांब पल्ल्याच्या ICBM क्षेपणास्त्रांची मारक क्षमता सुमारे 10 हजार किलोमीटरपेक्षा जास्त आहे, याचाच अर्थ हे मिसाईल अमेरिकेपर्यंत सहज पोहचू शकते. त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता वाढली आहे.
