AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नॉर्वेचे लेखक जॉन फॉसे यांना साहित्याचे नोबेल जाहीर

नॉर्वेजियन लेखक जॉन फॉसे यांना साल 2023 चा साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

नॉर्वेचे लेखक जॉन फॉसे यांना साहित्याचे नोबेल जाहीर
jon fosseImage Credit source: socialmedia
| Updated on: Oct 05, 2023 | 9:31 PM
Share

स्टॉकहोम | 5 ऑक्टोबर 2003 : साहित्य क्षेत्रातील बहुमोल कामगिरीसाठी नॉर्वेजियन लेखक जॉन फॉसे यांना साल 2023 चा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार त्यांना त्यांच्या अभिनव नाटकांसाठी आणि गद्य लेखनासाठी जाहीर झाला आहे. जॉन फासे यांच्या कांदबऱ्या त्यांनी ज्या शैलीत लिहील्या आहेत, त्यांना ‘फॉसे मिनिमलिज्म’ नावाने ओळखले जाते. जॉन फासे यांनी लिहीलेली दुसरी कांदबरी ‘स्टेंग्ड गिटार’ ( 1985 ) यात ‘फॉसे मिनिमलिज्म’ शैलीची ओळख होते.

फॉसे आपल्या लेखात ज्या वेदनांना शब्दात उतरवितात, त्या सामान्यपणे लिहीणे अवघड असते. आपल्या रोजच्या जीवनातील अनुभव आणि भावनांना त्यांनी आपल्या लिखाणात मांडल्या आहेत. जॉन फॉसे आणि नॉर्वेजियन नाईनोर्स्क साहित्याचे भीष्म पितामह म्हणून ओळखल्या जाणारे टार्जेई वेसास यांच्या लेखनशैलीत समानता आहे.

साल 2022 मध्ये हा पुरस्कार फान्सच्या लेखिका एनी एनॉक्स यांना मिळाला होता. एनी यांनी साहसी क्लिनिकल एक्युटीवर लेखन केले आहे. एनी एनॉक्स यांनी फ्रेंच, इंग्लिशमध्ये अनेक कांदबऱ्या, लेखन, नाटक आणि चित्रपटाचे लेखन केले आहे. साल 2021 मध्ये साहित्याचे नोबेल कांदबरीकार अब्दुलराजक गुरनाह यांना देण्यात आले होते. त्यांनी आपल्या लेखनाने वसाहतवादाचे परिणाम, संस्कृती याबद्दल केलेल्या लेखनासाठी हा पुरस्कार दिला होता.

साल 2019 मध्ये साहित्याचे नोबेल ऑस्ट्रीयाई मुळ असलेल्या लेखक पीटर हँडका यांना मिळाला होता. त्यांना हा पुरस्कार इनोवेटीव्ह लेखन आणि भाषेतील नवीन प्रयोगासाठी मिळाला होता. फॉसे आधुनिकता कलात्मक तंत्रासह भाषा आणि भौगोलिक दोन्ही प्रकारचे मजबूत स्थानिय संबंध जोडतात. त्यांनी आपल्या वॉल्वरवांडशाफ्टनमध्ये सॅम्युअल बेकेट, थॉमस बर्नहार्ड आणि जॉर्ज ट्रकल सारख्यांचे नावे समाविष्ट केली आहेत.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.