आता अमेरिका या मुस्लिम राष्ट्रासोबत करणार सर्वात मोठी डील, ट्रम्प लवकरच घेणार मोठा निर्णय
नुकतीच सौदी अरेबिया आणि पाकिस्तानदरम्यान मोठी डील झाली आहे, या करारांतर्गत जर एका देशावर कोणी हल्ला केला तर तो दुसऱ्या देशावर देखील हल्ला मानला जाणार आहे, यानंतर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

नुकतीच सौदी अरेबिया आणि पाकिस्तानदरम्यान मोठी डील झाली आहे, या करारांतर्गत जर एका देशावर कोणी हल्ला केला तर तो दुसऱ्या देशावर देखील हल्ला मानला जाणार आहे, हे फक्त संरक्षण क्षेत्रापूरतंच मर्यादीत नाही तर याची व्याप्ती सैन्य ट्रेनिंग, शस्त्रांची निर्यात, संयुक्त सैन्य अभ्यास आणि तांत्रिक बाबतींमध्ये मदत इथपर्यंत वाढवण्यात आली आहे.
आता सौदी अरेबीया देखील याच पद्धतीची डील अमेरिकेसोबत करण्याचा प्रयत्न करत आहे. ही डील झाल्यास त्याचा सर्वात मोठा फायदा हा सौदीला होणार असून, सौदी हे जगातील सर्वाधिक शक्तीशाली मुस्लिम राष्ट्र बनेल. फायनांशियल टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान हे पुढील महिन्यात अमेरिकेला जाणार आहे, आणि याचदरम्यान अमेरिकेसोबत हा करार होण्याची शक्यता आहे.
अमेरिका सुरक्षेची हमी देणार?
फायनांशियल टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार हा करार जसा अमेरिकेनं कतारसोबत केला आहे, त्याचप्रमाणे असणार आहे. कतार आणि अमेरिकेचा जो करार झाला आहे, त्या करारानुसार जर कतारवर कोणी हल्ला केला तर तो हल्ला अमेरिकेवर झाला असं मानलं जाईल. ही डील याच महिन्यात झाली आहे, आता अशीच एक डील सौदी अरब आणि अमेरिकेमध्ये पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे. ज्या करारानुसार अमेरिका सैदी अरेबियाला पूर्ण सुरक्षा पूरवण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ असा की जर उद्या हा करार झाल्यानंतर सौदी अरेबियावर हल्ला झाला तर तो हल्ला अमेरिकेवर झाला असं समजलं जाईल, आणि त्यानंतर अमेरिका यासंदर्भात कारवाई करू शकते.
सौदीला का करायचा आहे अमेरिकेसोबत करार?
सौदी अरेबिया गेल्या अनेक वर्षांपासून या कराराची वाट पहात आहे, कतारला जशी अमेरिकेकडून सुरक्षेची गॅरंटी मिळाली, तशीच गॅरंटी आपल्याला देखील मिळावी अशी सौदी अरेबियाची इच्छा आहे, अमेरिका सौदीच्या जवळ आल्यास इस्रायल आणि सौदी अरेबियाचे संबंध देखील सुधारण्यास मदत होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर ही डील सौदी अरेबियासाठी महत्त्वाची असून, याकडे आता संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.
