AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sindoor : पाकिस्तानात 100 KM आत घुसून मारलं, जाणून घ्या Air Strike मध्ये उद्धवस्त झालेले 9 तळ कुठे आहेत?

Operation Sindoor : भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या बदल्याची कारवाई सुरु केली आहे. भारताने पाकिस्तानात खोलवर घुसून एअर स्ट्राइक केलाय. भारताने पाकिस्तानचे कुठले-कुठले तळ उडवलेत या ऑपरेशनमध्ये त्या बद्दल जाणून घ्या.

Operation Sindoor : पाकिस्तानात 100 KM आत घुसून मारलं, जाणून घ्या Air Strike मध्ये उद्धवस्त झालेले 9 तळ कुठे आहेत?
India Air Strike In Pakistan
| Updated on: May 07, 2025 | 8:19 AM
Share

भारताने दहशतवादाविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. बुधवारी रात्री 1.30 वाजता POK आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्धवस्त केले. थेट एअर स्ट्राइक केला. त्याला ऑपरेशन सिंदूर नाव देण्यात आलं आहे. हे तिन्ही सैन्य दलांच जॉइंट ऑपरेशन होतं. भारताच्या पराक्रमी सैन्याने पाकिस्तानातील 4 आणि पाकव्याप्त काश्मीरमधील पाच तळांना टार्गेट केलं. भारताची गुप्तचर यंत्रणा RAW ने सर्व टार्गेटस निवडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. कुठल्या-कुठल्या ठिाकणी हे स्ट्राइक केले? आणि ते इंटरनॅशनल बॉर्डरपासून किती लांब आहेत? बहावलपुर : हे आंतरराष्ट्रीय सीमेपासून जवळपास 100 किलोमीटर अंतरावर आहे. इथे जैश-ए-मोहम्मदच मुख्यालय आहे. भारतीय सैन्य दलाच्या कारवाईत हे उद्धवस्त झालय.

मुरीदके : हा दहशतवादी तळ आंतरराष्ट्रीय सीमेपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. इथे लश्कर-ए-तैयबाचा तळ होता. मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याशी याचा संबंध होता. गुलपुर : हा दहशतवादी तळ LoC (पुंछ-राजौरी) पासून 35 किलोमीटर दूर आहे.

लश्कर कॅम्प सवाई : POK च्या तंगधार सेक्टरमध्ये 30 किलोमीटर आत आहे.

बिलाल कॅम्प : हा जैश-ए-मोहम्मदचा लॉन्चपॅड आहे. हा तळ दहशतवाद्यांना सीमेपलीकडे पाठवण्यासाठी वापरला जात होता.

कोटली : LOC पासून 15 किमी अंतरावर लष्करचा तळ होता. 50 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना सामावून घेण्याची क्षमता होती.

बरनाला कॅम्प : हा दहशतवादी तळ LOC पासून 10 किलोमीटर अंतरावर आहे.

सरजाल कॅम्प : सांबा-कठुआसमोर इंटरनॅशनल बॉर्डरपासून 8 किमी अंतरावर हा जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा प्रशिक्षण तळ होता.

मेहमूना कॅम्प (सियालकोट जवळ)– हा हिज्बुल मुजाहिदीनचा दहशतवादी प्रशिक्षण तळ होता. आंतरराष्ट्रीय सीमेपासून 15 किमी अंतरावर होता.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.